Join us  

पत्रकाराच्या प्रश्नावर भडकला श्रेयश अय्यर; पत्रकार परिषदेतही खेचला षटकार

त्याच अनुषंगाने पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर श्रेयश भडकल्याचं पाहायला मिळालं. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 10:54 AM

Open in App

विश्वचषक स्पर्धेतील ७ व्या सामन्यात श्रीलंकेसमोर भारताच्या १९६ धावांमध्ये तीन विकेट पडल्या होत्या. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर खेळत असलेल्या श्रेयश अय्यरने मोठे फटके मारले. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने तुफानी फटकेबाजी केली. अय्यरने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वर्ल्ड कप स्पर्धेत स्टँडच्या दिशेने १०६ मीटरपैकी सर्वात लांब षटकार मारला. आपल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे श्रेयश अय्यरचं कौतुक होत असतं. मात्र, शॉर्ट बॉलवर तो काहीसा अडखळतो, यावरुन समिक्षक टीकाही करतात. त्याच अनुषंगाने पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर श्रेयश भडकल्याचं पाहायला मिळालं. 

रोहित शर्मा ( ४ धावा) लवकर बाद झाल्यानंतर शुभमन गिल ( ९२ धावा) आणि विराट कोहली (८८धावा) यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी १८९ धावांची भागीदारी झाली. यानंतर श्रेयस अय्यरने ५६ चेंडूंत तीन चौकार आणि सहा षटकारांसह ८२ धावांची स्फोटक खेळी केली. भारताने ५० षटकांत ८ बाद ३५७ धावा केल्या. श्रेयशच्या तुफानी फटकेबाजीमुळे भारताने मोठी धावसंख्या उभारली. भारताने हा सामना जिंकल्यानंतर श्रेयशने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी, त्याला शॉर्ट बॉलवरील खेळीसंदर्भातही प्रश्न विचारण्यात आला. 

विश्वचषक स्पर्धेतील पुढील सामन्यात द. आफ्रिकेच्या पेसर्स गोलदांजांचा कसा सामना करणार, असा प्रश्न पत्रकाराने विचारला होता. त्या, प्रश्नावर श्रेयश काहीसा नाराज झाला. द. आफ्रिकेच्या टीमसोबत खेळण्यास पुढील सामन्यासाठी तुम्ही किती तयार आहात, असा प्रश्न पत्रकाराने विचारला होता. त्यावर, अय्यरने स्पष्टपणे उत्तर दिलं. 

'जेव्हा तुम्ही म्हणता की, ही माझ्यासाठी एक समस्या आहे, तेव्हा तुमचा अर्थ काय आहे? मला परेशान केलं? मी किती पूल शॉट खेळलो हे तुम्ही पाहिले आहेत का? हा सगळा माहोल तुम्ही लोकांनी बनवला आहे. माझ्या मतानुसार मला शॉर्ट चेंडूवर खेळण्यास कुठलीही अडचण नाही. जर तुम्ही एखाद्या चेंडूवर हीट शॉट मारण्याचा प्रयत्न करता, तर तुमचं आउट होणं निश्चित आहे, मग मगो शॉर्ट चेंडू असो किंवा ओव्हरपीच', असे उत्तर श्रेयशने दिले.  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघश्रेयस अय्यरपत्रकारभारत विरुद्ध श्रीलंका