मुंबई :
धडाकेबाज फटकेबाजीमुळे टी-२० प्रकारासाठी फिट असलेला युवा शुभमन गिल हा विश्व क्रिकेटमधील प्रतिभावान फलंदाजांपैकी एक असल्याचे मत भारताचे माजी मुख्य कोच रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे. २२ वर्षांचा गिल यंदा ‘आयपीएल’मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळत आहे.
शुभमन आयपीएलमध्ये चमक दाखवून टी-२० विश्वचषकासाठी राष्ट्रीय संघासाठी दावेदारी सिद्ध करू शकतो. लीगमध्ये शुभमनच्या सुरुवातीच्या कामगिरीची चर्चा करताना शास्त्री म्हणाले, ‘शुभमन हा देशातील आणि जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तो असाच खेळत राहिल्यास धावांचा डोंगर उभा करेल. तो खेळपट्टीवर स्थिरावला की, फलंदाजी अगदी सोपी होऊन जाते.
Web Title: Shubhaman gill is world class talented player former coach of Team India ravi Shastri
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.