Join us  

शुभमन विश्वस्तरीय प्रतिभावान खेळाडू, टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक शास्त्रींनी केलं कौतुक

धडाकेबाज फटकेबाजीमुळे टी-२० प्रकारासाठी फिट असलेला युवा शुभमन गिल हा विश्व क्रिकेटमधील प्रतिभावान फलंदाजांपैकी एक असल्याचे मत भारताचे माजी मुख्य कोच रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 8:48 AM

Open in App

मुंबई :

धडाकेबाज फटकेबाजीमुळे टी-२० प्रकारासाठी फिट असलेला युवा शुभमन गिल हा विश्व क्रिकेटमधील प्रतिभावान फलंदाजांपैकी एक असल्याचे मत भारताचे माजी मुख्य कोच रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे. २२ वर्षांचा गिल यंदा ‘आयपीएल’मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळत आहे. 

शुभमन आयपीएलमध्ये चमक दाखवून टी-२० विश्वचषकासाठी राष्ट्रीय संघासाठी दावेदारी सिद्ध करू शकतो. लीगमध्ये शुभमनच्या सुरुवातीच्या कामगिरीची चर्चा करताना शास्त्री म्हणाले, ‘शुभमन हा देशातील आणि जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तो असाच खेळत राहिल्यास धावांचा डोंगर उभा करेल. तो खेळपट्टीवर स्थिरावला की, फलंदाजी अगदी सोपी होऊन जाते. 

टॅग्स :शुभमन गिलगुजरात टायटन्सआयपीएल २०२२रवी शास्त्री
Open in App