Shubman Gill Fighting Hundred, Punjab vs Karnatak, Ranji Trophy 2025 : ऑस्ट्रेलियातील खराब कामगिरीनंतर BCCI ने भारतीय संघातील बड्या खेळाडूंना थेट रणजी क्रिकेट खेळण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार अनेक बडे खेळाडू रणजीच्या मैदानात उतरले. त्यापैकी बहुतांश फ्लॉप ठरले. फक्त रवींद्र जाडेजाने फलंदाजी आणि गोलंदाजीने साऱ्यांना इम्प्रेस केले होते. त्यानंतर आता भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल यानेही रणजी ट्रॉफीमध्ये पंजाबकडून खेळताना झुंजार शतक ठोकले. रणजी ट्रॉफीच्या सहाव्या फेरीत त्याने कर्नाटकविरुद्ध शतक झळकावले. या शतकासह गिलने आपल्या संघाचा पराभव लांबणीवर टाकला, पण पराभव टाळणे त्याला शक्य झाले नाही.
पंजाबचा संघ पहिल्या डावात अवघ्या ५५ धावांवर बाद झाला होता. त्यानंतर कर्नाटकने ४७५ धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने दुसऱ्या डावात अवघ्या ६५ धावांवर ५ बळी गमावले होते. १०० धावांच्या आत ऑलआऊट होण्याचा धोका पुन्हा एकदा पंजाब संघावर होता. त्यावेळी शुबमन गिलने संयमी खेळी करत संघाला कसाबसा द्विशतकी आकडा गाठून दिला. त्याने १०२ धावांची खेळी केली, पण तो संघाचा पराभव टाळू शकला नाही.
शुबमन गिलची फटकेबाजी-
पंजाबचा एक डाव व २०७ धावांनी पराभव
कर्नाटकने पहिल्या डावाअखेर ४२० धावांची आघाडी घेतल्यानंतरच पंजाबचा संघ बॅकफूटवर गेला होता. त्यानंतर दुसऱ्या डावातही पंजाबच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. ५ बाद ६५ या धावसंख्येवरून गिलने एकतर्फी किल्ला लढवला. तळाच्या फलंदाजांना सोबत घेत त्याने शतक ठोकले. गिलने १७१ चेंडूत १०२ धावा केल्या. पण अखेर २१३ धावांवर पंजाबचा संघ बाद झाला आणि कर्नाटकने एक डाव व २०७ धावांनी विजय मिळवला.
Web Title: Shubman Gill Fighting Century knock for Punjab but failed to prevent team from losing against vs Karnatak in Ranji Trophy 2025
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.