वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्व चाहत्यांच्या नजरा १४ ऑक्टोबर रोजी होणार्या भारत आणि पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यातील सामन्यावर खिळल्या आहेत. पण, डेंग्यूमुळे शुबमन गिल याही सामन्याला खेळेल का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भारताचा सलामीवीर शुबमन डेंग्यूमुळे पहिले दोन सामने खेळू शकलेला नाही आणि कालच तो अहमदाबाद येथे दाखल झाला आहे. चेन्नईतील डेंग्यूवर उपचार घेतल्यानंतर भारत-पाकिस्तान सामन्यासाठी अहमदाबादला पोहोचला आणि नेट्समध्ये सरावालाही सुरुवात केली आहे. दरम्यान, भारतातील प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनाही डेंग्यू झाला आहे. हर्षा भोगले यांनी ही माहिती ट्विट करून दिली असून तेही भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये दिसणार नाही.
हर्षा भोगले यांनी ट्विट केले की, २०२३च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील दरम्यान भारत-पाकिस्तान सामन्याचा भाग होऊ शकणार नाही याबद्दल मी निराश आहे. कारण मलाही डेंग्यूचा त्रास झाला आहे, त्यामुळे मी खूप कमकुवत झालो आहे आणि माझी प्रतिकारशक्तीही कमी झाली आहे. मी भारत आणि बांगलादेश यांच्यात १९ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यासाठी परत येण्याची आशा करतो. माझ्यासोबत काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांनी मला खूप मदत केली आहे. ज्यासाठी मला त्यांचेही आभार मानायचे आहेत.