Asia Cup 2023 : भारतीय संघात विराट कोहली आणि हार्दिक पांड्या हे सर्वाधिक तंदुरुस्त खेळाडू म्हणून ओळखले जातात. पण, शुबमन गिलने ( Shubman Gill ) या दोघांनाही मागे टाकले आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचे शिबीर बंगळुरू येथे सुरू आहे आणि तेथे भारतीय खेळाडूंची Yo-Yo Test घेतली गेली. यामध्ये विराट कोहली १७.२ गुण मिळवत उतीर्ण झाला होता आणि ही सर्वाधिक गुणसंख्या असेल असा अंदाज बांधला गेला होता, परंतु शुबमन गिलने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
शुबमन गिलने या टेस्टमध्ये सर्वाधिक १८.७ गुण मिळवले आहेत. भारतीय क्रिकेटपटूंसाठी १६.५ ही पासिंग गुणसंख्या ठरवण्यात आली होती आणि विराटने १७.२ गुण कमावले होते. जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा, संजू सॅमसन ( हे आयर्लंड दौऱ्यावरून आले आहेत) आणि लोकेश राहुल यांना या टेस्टमधून वगळण्यात आले आहे.
यो-यो चाचणी ही एरोबिक सहनशक्ती तंदुरुस्ती चाचणी आहे, त्यामुळे तुम्ही शेवटचे कधी खेळलात आणि मागील आठवड्यात तुम्ही किती काम केले यावरून तुमचे निकाल भिन्न असू शकतात. शुबमन गिलने आता १८.७ गुणांसह विक्रम केला आहे. बहुतांश खेळाडूंचे १६.५ ते १८ असे गुण आहेत.
सूत्रानुसार, "खेळाडूंच्या दोन स्पर्धांमध्ये अंतर असल्यास राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा क्रीडा विज्ञान संघ आणि भारतीय संघाचे क्रीडा कर्मचारी सर्व अनिवार्य चाचण्या घेतात." ऑक्टोबरमध्ये भारतात होणा-या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी केवळ संधीचा फायदा घेण्यासाठी कट ऑफ, BCCI ने तंदुरुस्ती आणि कंडिशनिंग शिबिराचे आयोजन केले होते. सहा वर्षापूर्वी माजी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच शंकर बसू यांच्या यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच यो-यो चाचण्या सुरू झाल्या तेव्हा १६.१ असे गुण ठेवले गेले होते.
आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, राखीव खेळाडू - संजू सॅमसन