Join us  

शेतात घडलेला क्रिकेटपटू...शुभमनचा प्रेरणादायी प्रवास!

कडव्या स्पर्धेमुळे शुभमनला सातत्याने संघात स्थान मिळाले नाही. आज त्याने आपले नाणे खणखणीत वाजवले आहे आणि हा शेतकऱ्याचा पोर आता काही थांबणारा नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 8:04 AM

Open in App

रोहित नाईक, वरिष्ठ उपसंपादक

कडव्या स्पर्धेमुळे शुभमनला सातत्याने संघात स्थान मिळाले नाही. आज त्याने आपले नाणे खणखणीत वाजवले आहे आणि हा शेतकऱ्याचा पोर आता काही थांबणारा नाही.

पृथ्वी शॉच्या नेतृत्वात भारताने २०१८ साली चौथ्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषक पटकावला. त्यावेळी कर्णधार म्हणून पृथ्वीचा गाजावाजा झालाच, तसेच अंतिम सामन्यातील शतकवीर मनजोत कालराचेही खूप कौतुक झाले. यामध्ये आणखी एक खेळाडू भाव खाऊन गेला, तो म्हणजे शुभमन गिल, अंतिम सामन्यात अपयशी ठरलेल्या शुभमनने संपूर्ण स्पर्धेत खोऱ्याने धावा काढल्या. या कामगिरीमुळे त्याची चर्चा रंगली ती भविष्यातील 'विराट कोहली म्हणून.

याच शुभमनने न्यूझीलंडविरुद्ध तडाखेबंद द्विशतक ठोकत क्षमता दाखवली. २०२१च्या जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाबा कसोटीतील शुभमनची खेळी कशी विसरता येणार? ३२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाचा पाया मजबूत करताना शुभमनने १४६ चेंडूंत २१ धावांची संयमी खेळी केली. येथून शुभमनच्या रूपाने भारताला भक्कम फलंदाज लाभला. 

प्रशिक्षणासाठी लखविंदर यांनी शेती सोडलीशुभमनच्या क्रिकेट प्रशिक्षणासाठी लखविंदर यांनी शेती सोडली आणि मोहालीत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. पंजाब क्रिकेट संघटनेत प्रवेश झाल्यानंतर शुभमनचे क्रिकेट अधिक बहरले. मात्र, यामध्ये वडील लखविंदर आणि त्यांच्या शेतीचा मोठा वाटा आहे. १९ वर्षांखालील क्रिकेट, रणजी क्रिकेट, आयपीएल, कसोटी, टी-२० आणि आता एकदिवसीय अशा क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात या पट्ट्याने आपली छाप पाडली. शुभमनच्या फलंदाजीमध्ये सचिनसारखा उत्कृष्ट टायमिंग आहे, कोहलीसारखी आक्रमकता आहे आणि द्रविडसारखा प्रचंड संयमही आहे. त्यामुळेच आज त्याला भारतीय क्रिकेटचे भविष्य मानले जाते.

शुभमनला बाद करा आणि शंभर रुपये जिंकाशुभमनच्या या यशामध्ये मेहनत तर आहेच, पण एका व्यक्तीने लावलेली ताकद आणि तिचे स्वप्नही आहे. ती व्यक्ती म्हणजे शुभमनचे वडील लखविंदर सिंग, पंजाबच्या फझिल्का जिल्ह्यातील एका लहानशा गावात जन्मलेल्या शुभमनचे वडील शेतकरी त्यांचे मन शेतापेक्षा जास्त रमले ते क्रिकेटमध्ये. देशाकडून खेळण्याचे त्यांचे स्वप्न.

आपणही क्रिकेटपटू म्हणून नाव कमावू या जिद्दीने त्यांनी स्वतःला झोकून दिले. पण, यश मिळाले नाही. अखेर त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले ते मुलाच्या रूपाने. छोट्या शुभमनला व्यवस्थित सराव करता यावा, यासाठी लखविंदर यांनी आपल्या शेतातच क्रिकेट मैदान तयार केले आणि त्यावर खेळपट्टीसाठी टर्फही टाकले.

गावातील मुलांना ते सतत चॅलेंज देत की, शुभमला बाद करा आणि शंभर रुपये जिंका.' मग काय, गावातली BY M INDI गोलंदाजी करायचे. खूप कमी जणांनी शंभर रुपये मिळवलेत, पण यामुळे शुभमनची फलंदाजी भक्कम झाली.

टॅग्स :शुभमन गिल
Open in App