ICC ODI Rankings : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सर्व आघाडींवर भारतीय खेळाडूंनी सरस कामगिरी केली आहे. शुबमन गिलची बॅट अपेक्षित तळपली नसली तरी रोहित शर्मासोबत तो खेळपट्टीवर जम बसवून उभा राहिला आहे. विराट कोहलीचा फॉर्म प्रतिस्पर्धींना धडकी भरवणारा आहे. अशात आयसीसीने आज जाहीर केलेल्या वन डे क्रमवारीत भारताच्या फलंदाजांचा डंका दिसतोय. तेच दुसरीकडे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम संकटात सापडला आहे.
...अन् बाबर आजमचा 'काटा' काढायचा प्लान तेव्हाच ठरला; पाकिस्तान संघातील कारस्थानी कोण?
आयसीसीने जाहीर केलेल्या वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत बाबर आजमने नंबर वन स्थान टिकवले असले तरी त्याच्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शुबमन गिल यांच्यातले रेटींग पॉईंटचे अंतर कमी झाले आहे. आता फक्त ६ रेटींग पॉईंटने बाबर पुढे आहे आणि त्याचा निराशाजनक खेळ पाहता तो या क्रमांकावर फार काळ टिकेल असे वाटत नाही. बाबरला वर्ल्ड कप स्पर्धेत ५ सामन्यांत १५७ धावा करता आल्या आहेत आणि त्याचे रेटींग पॉईंट ८२९ इतके कमी झाले आहेत. शुबमन ८२३ रेटींग पॉईंटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. बाबरला केवळ शुबमनकडूनच नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेचा ओपनर क्विंटन डी कॉक याच्याकडूनही धोका आहे. क्विंटनने या वर्ल्ड कपमध्ये ३ शतकं झळकावली आहेत आणि तो ३ स्थानांच्या सुधारणेसह ७६९ रेटींग पॉईंटसह तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. आफ्रिकेचाच हेनरिच क्लासेन ( ७५६) ४ स्थानांच्या सुधारणेसह चौथ्या क्रमांकावर आला आहे.
क्लासेनची ही कारकीर्दितील सर्वोत्तम क्रमवारी आहे. विराट कोहली ( ७४७) आणि डेव्हिड वॉर्नर ( ७४७) संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर आहेत. रोहित शर्मा नवव्या क्रमांकावरून ८ वर आला आहे. न्यूझीलंडचा मधल्या फळीतील फलंदाज डॅरील मिचेल १६ स्थानांच्या सुधारणेसह १३व्या क्रमांकावर आला आहे. गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड अव्वल क्रमांकावर कायम आहे. भारताचा मोहम्मद सिराज दुसऱ्या स्थानावर सरकला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजने ५ स्थानांच्या सुधारणेसह तिसरे स्थान पटकावले आहे. कुलदीप यादव ९ व्या क्रमांकावर कायम आहे.
Web Title: Shubman Gill - No.2, Virat Kohli - No.6, Rohit Sharma - No.8 ; Race for No.1 ODI batter ranking hots up as challengers make their move
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.