भारतीय संघाचा युवा फलंदाज शुभमन गिल सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो.. मैदानावरील कामगिरीमुळे तो चर्चेत असतोच, शिवाय त्याचे नाव अनेक अभिनेंत्रीसोबत जोडले जात आहे. सुरुवातीला शुभमनचं नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिच्यासोबत जोडलं गेलं. त्यानंतर तो या साराला नव्हे तर बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिला डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली. शुभमन व सारा खान यांचे डिनर डेटचे अनेक फोटोही व्हायरल झाले होते. पण, भारताच्या या फलंदाजाचं नाव आता तिसऱ्याच अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे.
सारा तेंडुलकर 'डॉक्टर' बनणार, शुभमन गिल अजून कॉलेजमध्येच अडकलाय; जाणून घ्या दोघांचं शिक्षण
मीडियामध्ये हे वृत्त व्हायरल झाले आहे की शुभमनचं टॉलिवूड अभिनेत्री पुष्पा फेम रश्मिका मंदानावर क्रश आहे. पण, या वृत्तावर भारतीय फलंदाजानेही आपले मत व्यक केले. एका वेबसाईटने असा दावा केली की, शुभमनने एका मुलाखतीत रश्मिकावर क्रश असल्याचे मान्य केले. पण, या वृत्तावर शुभमन भडकला आहे आणि त्याने असं काहीच नसल्याचे स्पष्ट केले आहे.
शुभमन गिल देखील आज भारतीय क्रिकेटमधील एक उगवता तारा आहे. शुभमनचा जन्म ८ सप्टेंबर १९९९ रोजी पंजाबमधील फाजिल्का येथे झाला. तो शेतकरी कुटुंबातून येतो. शुभमन गिलने आपले शालेय शिक्षण मोहालीच्या मानव मंगल स्मार्ट स्कूलमधून केले. लहान वयातच क्रिकेटचे प्रशिक्षण सुरू केल्याने शुभमनच्या अभ्यासावरही परिणाम झाला. झटपट यशामुळे तो पूर्णपणे क्रिकेटच्या जगाकडे वळला. पण, त्याने पदवी पूर्ण केल्याचे काही वृत्तांमधून समोर आले आहे. तो सध्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील सदस्य आहे आणि तिसऱ्या कसोटीत KL Rahulच्या जागी त्याला संधी दिली गेली होती, परंतु तो काही खास करू शकला नाही.
Web Title: Shubman Gill rejects rumours of admitting Rashmika Mandanna as his crush in a recent media interaction.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.