Join us  

Shubman Gill India vs New Zealand: “सारा सारा..,” शुबमन गिलसमोर चाहत्यांच्या घोषणा; Video व्हायरल

न्यूझीलंडविरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा फलंदाज शुबमन गिलनं २०८ धावांची तुफान खेळी केली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 9:37 AM

Open in App

भारतीय संघाचा स्टार युवा सलामीवीर शुबमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तुफान खेळी करत द्विशतक झळकावलं. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा १२ धावांनी पराभव केला. हैदराबाद येथील एकदिवसीय सामन्यात वनडेत गिलची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

दुहेरी शतक झळकावल्यानंतर सोशल मीडियापासून खेळ जगतापर्यंत सर्वत्र गिलच्याच नावाची चर्चा होती. परंतु यादरम्यान एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्याचे चाहते सारा…सारा.. असं ओरडताना ऐकू येत आहे. परंतु हा  व्हिडीओ न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील नसून तो श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यानचा आहे. 

श्रीलंका सीरिजदरम्यानचा व्हिडीओन्यूझीलंड विरुद्ध दुहेरी शतक झळकावल्यानंतर त्याचा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. Instagram वर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये शुबमन गिल हा बाऊंड्रीवर फिल्डिंग करताना दिसतोय. याचवेळी स्टँडमध्ये बसलेले चाहते मात्र सारा सारा अशा घोषणा देताना दिसत आहेत. परंतु त्यांना गिलनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु सारा नक्की कोण याचं कनफ्युजन मात्र चाहत्यांमध्ये आहे. शुबमन गिलचं नाव सारा तेंडुलकर आणि सारा अली खान यांच्यासोबत जोडण्यात आलं होतं. शुबमन गिल अनेकदा सारा अली खानसोबतही स्पॉट झाला होता.

टॅग्स :सारा अली खानभारतसारा तेंडुलकर
Open in App