Join us  

शुबमन गिल कॅप्टन, Prithvi Shaw चे पुनरागमन; सप्टेंबरमध्ये भिडणार न्यूझीलंडला!

रणजी करंडक, विजय हजारे व मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा गाजवूनही भारतीय संघात स्थान न मिळालेल्या Prithvi Shaw चे पुनरागमन झाले आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 9:41 AM

Open in App

रणजी करंडक, विजय हजारे व मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा गाजवूनही भारतीय संघात स्थान न मिळालेल्या Prithvi Shaw चे पुनरागमन झाले आहे. शुबमन गिल (  Shubman Gill ) या संघाचे नेतृत्व करताना दिसेल. भारतीय संघ सप्टेंबरमध्ये आशिया चषक स्पर्धेत खेळणार आहे. त्याच दरम्यान भारताचा अ संघ ( India A )  मायदेशात न्यूझीलंड अ ( New Zealand A) चा सामना करणार आहे. त्यात ३ चार दिवसीय व ३ वन डे सामने होणार आहेत आणि यासाठीचा संभाव्य संघ समोर आला आहे. BCCI ने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु TOI ने हा संभाव्य संघ असेल असा दावा केला आहे. 

न्यूझीलंड अ संघाच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक ( Schedule for New Zealand A tour to India)

  • पहिली ४ दिवसीय लढत - १ -४ सप्टेंबर
  • दुसरी ४ दिवसीय लढत - ८-११ सप्टेंबर
  • तिसरी ४ दिवसीय लढत - १५-१८ सप्टेंबर

 

  • पहिला लिस्ट A सामना - २२ सप्टेंबर
  • दुसरा लिस्ट A सामना - २५ सप्टेंबर 
  • तिसरा लिस्ट A सामना - २७ सप्टेंबर 

 

भारत अ वन डे संघ - शुबमन गिल ( कर्णधार ) पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड, हनुमा विहारी, इशान किशन, रिशी धवन, वोशिंग्टन सुंदर, प्रवीण दुबे, मयांक मार्कंडे, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, केएस भारत, वेंकटेश अय्यर, पुलकित नारंग, राहुल चहर, यश दयाल (Gill (C), Shaw, Ruturaj, Vihari, Ishan, Rishi Dhawan, Sundar, Praveen Dubey, Markande, Prasidh, Siraj, KS Bharat, Venky Iyer, Pulkit Narag, Rahul Chahar, Yash Dayal.)

४ दिवसीय सामन्यासाठीचा संघ - शुबमन गिल ( कर्णधार), यश दयाल, हनुमा विहारी, रजत पाटीदार, सर्फराज खान, सुंदर, केएस भारत ( यष्टीरक्षक), शाम मुलानी, जलाज  सक्सेना, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, यशस्वी जैस्वाल, शुभमन शर्मा, अक्षय वाडकर, शाहबाज अहमद, मणिशंकर मुरासिंग. ( Gill (C), Yash Dubey, Vihari, Patidar, Sarfaraz Khan, Sundar, KS Bharat (WK), Mulani, Saxena, Thakur, Siraj, Jaiswal, Shubham Sharma, Wadkar, Shahbaz Ahmed, Manisankar Murasingh.)

 

टॅग्स :शुभमन गिलपृथ्वी शॉभारत विरुद्ध न्यूझीलंड
Open in App