भारतीय क्रिकेट टीमधील सलामीचा फलंदाज शुभमन गिलच्या शानदार खेळीची आयसीसीने दखल घेतली आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील अविस्मरणीय कामगिरीमुळे 'ICC प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कार जाहीर झाला आहे.
शुभमन गिलने जानेवारीमध्ये जोरदार केळी केली. एकदिवसीय स्वरूपात, श्रीलंका आणि न्यूझीलंड या दोन्ही विरुद्ध मोठ्या धावा केल्या. त्याने जानेवारीमध्ये 567 धावा करून, यामध्ये तीन शतकांपेक्षा जास्त धावसंख्येचा समावेश होता, 23 वर्षीय शुभमनने अविस्मरणीय खेळी केली.
शुभमन गिलने ( Shubman Gill) न्यूझिलंड विरुद्धच्या सामन्यात रेकॉर्ड ब्रेकिंग खेळी करताना टीम इंडियाला धावांचा डोंगर उभारून दिला. रोहित शर्मा, विराट कोहली व इशान किशन हे आघाडीचे फलंदाज माघारी परतल्यानंतर शुभमनने स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांची त्याने धुलाई करताना विक्रमी धावा केल्या.
शुभमनला सूर्यकुमार यादव व हार्दिक पांड्या याची तुल्यबळ साथ मिळाली. हार्दिकच्या विकेटने या सामन्यात वादाची ठिणगी पडली. पण, शुभमन अखेरपर्यंत खेळपट्टीवर उभा राहिला आणि न्यूझीलंडसमोर तगडे आव्हान उभे केले. त्याने नाबाद 208 धावा फक्त 149 चेंडूंमध्ये 28 चौकार ठोकत केल्या.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सूर्यकुमार यादव.
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), ॲश्टन आगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स कॅरी, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन.
बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी मास्टरकार्ड ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा नागपुरात 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दिल्ली, धर्मशाला आणि अहमदाबाद येथे तीन कसोटी सामने खेळणार आहे. कसोटी मालिका झाल्यानंतर भारतीय संघाच्या घरच्या मालिकेचा शेवट वन डे मालिकेतून होणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
9 ते 13 फेब्रुवारी, पहिला कसोटी सामना, नागपूर17 ते 21 फ्रेब्रुवारी, दुसरा कसोटी सामना, दिल्ली1 ते 5 मार्च, तिसरा कसोटी सामना, धर्मशाला9 ते 13 मार्च, चौथा कसोटी सामना, अहमदाबाद ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत वन डे मालिका
17 मार्च, शुक्रवार, पहिला सामना, मुंबई 19 मार्च, रविवार, दुसरा सामना, विझाग22 मार्च, बुधवार, तिसरा सामना, चेन्नई