शुबमनचं शतक हुकलं, वडील झाले नाराज; पण सेहवागनं दिली भन्नाट प्रतिक्रिया

मैदानात शुबमनची, तर मैदानाबाहेर विरेंद्र सेहवागची बॅटिंग

By कुणाल गवाणकर | Published: January 20, 2021 08:29 PM2021-01-20T20:29:17+5:302021-01-20T20:30:11+5:30

whatsapp join usJoin us
Shubman Gills father says century would have been good parents will be parents reacts Virender Sehwag | शुबमनचं शतक हुकलं, वडील झाले नाराज; पण सेहवागनं दिली भन्नाट प्रतिक्रिया

शुबमनचं शतक हुकलं, वडील झाले नाराज; पण सेहवागनं दिली भन्नाट प्रतिक्रिया

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि निर्णायक कसोटीत भारतानं शेवटच्या दिवशी ३२८ धावांचा यशस्वी पाठलाग केला. या विजयात सलामीवीर शुबमन गिलनं महत्त्वाची भूमिका बजावली. रोहित शर्मा लवकर बाद झाल्यावर शुबमननं चेतेश्वर पुजारासोबत मोलाची भागिदारी रचली. शुबमननं ९१ धावांची खेळी साकारली. त्याच्या खेळीनं भारताच्या विजयाचा पाया रचला. त्यावर ऋषभ पंतनं ८९ धावांची नाबाद खेळी करत कळस चढवला

क्रिकेटप्रेमींना लवकरच मिळणार आनंदाची बातमी?; बीसीसीआय मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

शुबमनच्या खेळीमुळे भारताला शेवटच्या दिवशी आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करता आला. त्यामुळे शुबमनच्या खेळीचं सगळ्यांकडूनच कौतुक होत आहे. मात्र शुबमनचे वडील लखविंदर गिल यांनी शुबमन ज्या प्रकारे बाद झाला, त्याबद्दल निराशा व्यक्त केली. शुबमननं शतक झळकावलं असतं, तर त्याचा आत्मविश्वास वाढला असता, असं लखविंदर गिल म्हणाले. 'शतकामुळे त्याला आत्मविश्वास मिळाला असता. तो संपूर्ण डावात व्यवस्थित खेळत होता. मग अचानक तो स्वत:च्या शरीरापासून दूर जाऊन का खेळला, ते मला कळत नाही,' असं गिल यांनी म्हटलं.

अब इंग्लंड की बारी! कांगारुंनंतर इंग्लंडला लोळविण्यासाठी भारत सज्ज; संघाची घोषणा

शुबमनच्या बाद होण्याच्या पद्धतीबद्दलही लखविंदर यांनी चिंता व्यक्त केली. 'शुबमन ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा डाव खेळला. तो फलंदाजी करताना सेट दिसत होता. पण तो ज्या पद्धतीनं बाद झाला, ती गोष्ट मला चिंताजनक वाटते. ऑफ स्टम्पच्या बाहेर असलेले चेंडू तो खेळायला गेला. ही गोष्ट बाकीच्या संघांच्यादेखील लक्षात आली असावी. शुबमन ही चूक पुन्हा करणार नाही. तो त्याच्या खेळात सुधारणा करेल, अशी आशा आहे,' असं लखविंदर पुढे म्हणाले. 

विराटनंतर शुबमन गिलच होणार भारताचा कर्णधार; काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान



भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं लखविंदर यांच्या विधानावर एका ओळीत प्रतिक्रिया दिली आहे. 'शेवटी आई बाबा तर आई बाबाच असतात', असं सेहवागनं म्हटलं आहे. विशेष म्हणजे वॉशिंग्टन सुंदरच्या वडिलांनीदेखील दोन दिवसांपूर्वी मुलाच्या कामगिरीवर अशाच प्रकारे भाष्य केलं होतं. चौथ्या कसोटीत संघ अडचणीत असताना वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर हे दोन अनुनभवी खेळाडू पाय रोवून उभे राहिले. सुंदरनं ६२ धावांची खेळी केली. त्यानं ठाकूरसोबत सातव्या गड्यासाठी १२३ धावांची भागिदारी रचली. यामुळे बॅकफूटवर गेलेल्या भारतीय संघानं कसोटीत कमबॅक केलं. मात्र सुंदरच्या वडिलांनी मुलानं शतक न झळकावल्यानं नाराजी व्यक्त केली होती. मोहम्मद सिराज दहाव्या क्रमांकावर खेळायला आला, त्यावेळी सुंदरनं मोठे फटके खेळायला हवे होते. पूल किंवा मोठे फटके खेळून त्यानं चौकार, षटकार ठोकायला हवेत, असं सुंदरचे वडील म्हणाले होते.

Web Title: Shubman Gills father says century would have been good parents will be parents reacts Virender Sehwag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.