दोन 'सारा' मध्ये फसलेला, आता तिसरी आली; शुभमन गिलसोबत 'Match'साठी तरुणीची टिंडरकडे मागणी

शुभमनच्या विक्रमासोबत आणखी एका फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 03:27 PM2023-02-02T15:27:47+5:302023-02-02T16:09:58+5:30

whatsapp join usJoin us
Shubman Gill’s Mystery Girl Fan’s Tinder Proposal During Ahmedabad T20I Goes VIRAL | दोन 'सारा' मध्ये फसलेला, आता तिसरी आली; शुभमन गिलसोबत 'Match'साठी तरुणीची टिंडरकडे मागणी

दोन 'सारा' मध्ये फसलेला, आता तिसरी आली; शुभमन गिलसोबत 'Match'साठी तरुणीची टिंडरकडे मागणी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दणदणीत विजयाची नोंद करताना मालिका २-१ अशी जिंकली. शुभमन गिलचे ( Shubman Gill) विक्रमी शतक आजच्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. शुभमनने आजच्या या नाबाद १२६ धावांच्या खेळीने मोठमोठे विक्रम मोडले. त्याच्या फटकेबाजीनंतर भारतीय जलदगती गोलंदाजांनी कमाल केली. 

शुभमन गिलने १२ चौकार व  ७ षटकारांसह १२६ धावांवर नाबाद राहिला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात युवा वयात शतक झळकाण्याचा विक्रमही शुभमनने नावावर केला. तो २३ वर्ष व१४६ दिवसांचा आहे आणि त्याने सुरेश रैनाचा ( २३  वर्ष व १५६ दिवस) विक्रम मोडला. शुभमनच्या या विक्रमासोबत आणखी एका फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या नात्याच्या चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगत असतात. अशातच एक फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे. एक चाहती मैदानात एक पोस्टर घेऊन उभी होती. यामध्ये टिंडर, शुभमनसोबत मॅच करा, असं लिहिलं होतं. 

तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताने १६८ धावांनी मोठा विजय मिळवत मालिकाही जिंकली आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतानं २३५ धावाचं तगडं लक्ष्य न्यूझीलंडसमोर ठेवलं. यावेळी भारताकडून युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलनं शानदार शतक झळकावलं आहे. त्यानंतर कर्णधार हार्दिकनं ४ विकेट्स घेत इतर गोलंदाजाच्या मदतीनं न्यूझीलंडला ६६ धावांत सर्वबाद करत सामना धावांनी जिंकला. 

टीम इंडियाने केला हा करिष्मा

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा टी२० सामना १६८ धावांनी जिंकला. भारताचा टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी २०१८ मध्ये भारताने आयर्लंडचा १४३ धावांनी पराभव केला होता. टी२० क्रिकेटमधील सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम श्रीलंका संघाच्या नावावर आहे. २००७ मध्ये श्रीलंकेने केनियन संघावर १७२ धावांनी विजय मिळवला होता.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: Shubman Gill’s Mystery Girl Fan’s Tinder Proposal During Ahmedabad T20I Goes VIRAL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.