"शुबमन गिलला भारतीय संघात लाडका म्हणून मिळतेय संधी, त्यापेक्षाही चांगले खेळाडू आहेत"

वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याच्याकडे चेतेश्वर पुजाराच्या तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी सोपवली गेली आहे. काहींच्या मते तो भविष्यात टीम इंडियाचा कर्णधारही बनू शकतो, परंतु

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 04:58 PM2023-07-17T16:58:47+5:302023-07-17T16:59:05+5:30

whatsapp join usJoin us
Shubman Gill's selection is not based on performance but favouritism . Has been Consistently inconsistent, Venkatesh Prasad  | "शुबमन गिलला भारतीय संघात लाडका म्हणून मिळतेय संधी, त्यापेक्षाही चांगले खेळाडू आहेत"

"शुबमन गिलला भारतीय संघात लाडका म्हणून मिळतेय संधी, त्यापेक्षाही चांगले खेळाडू आहेत"

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shubman Gill कडे भारताचा सुपर स्टार म्हणून पाहिले जातेय... गेल्या वर्षभरात त्याने वन डे, ट्वेंटी-२० आणि कसोटी क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करून दाखवली आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याच्याकडे चेतेश्वर पुजाराच्या तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी सोपवली गेली आहे. काहींच्या मते तो भविष्यात टीम इंडियाचा कर्णधारही बनू शकतो, परंतु भारताचा माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद याने शुबमनच्या कसोटी क्रिकेटमधील अलीकडच्या कामगिरीवर टीका केली. गिलची निवड कामगिरीच्या आधारावर झाली नसून पक्षपाताच्या आधारावर झाली आहे, असेही तो म्हणाला.


वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शुबमन गिलची कामगिरी अत्यंत खराब राहिली आणि तो केवळ ६ धावा करून बाद झाला. अलीकडची कामगिरी पाहता गिलने आशियाबाहेर एकही प्रभावी कसोटी डाव खेळला नाही आणि त्यामुळेच त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे. व्यंकटेश प्रसादने त्याच्या ट्विटर हँडलवर लिहिले, “मला शुबमन गिलच्या प्रतिभेचा आणि क्षमतेबद्दल खूप आदर आहे, परंतु दुर्दैवाने त्याची कामगिरी अत्यंत वाईट आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३० डावांनंतर ३०ची कसोटी सरासरी सामान्य आहे. मी अशा अनेक खेळाडूंचा विचार करू शकत नाही ज्यांना इतक्या संधी देण्यात आल्या आहेत.'' 



प्रसाद म्हणाला, “बरेच लोक अव्वल फॉर्ममध्ये आहेत. पृथ्वी शॉ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, सर्फराज खान प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शतक झळकावत आहे आणि बरेच लोक गिलपेक्षा अधिक संधींना पात्र आहेत. काही लोक इतके भाग्यवान असतात की त्यांना यशस्वी होण्यासाठी संधी दिली जाते तर काहींना तसे करण्याची परवानगी नसते." 

व्यंकटेशने पुढे लिहीले की, “गिलची निवड कामगिरीवर आधारित नाही तर पक्षपातावर आधारित आहे. त्याच्या कामगिरीत सातत्याने चढ-उतार होत आहेत. अनेक माजी क्रिकेटपटू असे पक्षपातीपणा पाहूनही आवाज उठवत नाहीत याचे हे एक कारण आहे..” 

शुभमन गिलने १७ कसोटी सामने खेळले असून ३२ च्या सरासरीने ९२७ धावा केल्या आहेत. वन डेमध्ये त्याची सरासरी ६५.५ आणि टी-२० मध्ये ४०.४ आहे. डॉमिनिका येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत शुभमन गिलला मोठी खेळी करता आली नाही. हा सामना एक डाव आणि १४१ धावांनी जिंकण्यात भारताला यश आले असले तरी गिलच्या बॅटमधून फक्त ६ धावा झाल्या. 

Web Title: Shubman Gill's selection is not based on performance but favouritism . Has been Consistently inconsistent, Venkatesh Prasad 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.