नवी दिल्ली : आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या खासगी स्टाफमधील एका सदस्याला स्टिंग आॅपरेशनमध्ये उत्तर प्रदेश क्रिकेट संघाच्या खेळाडूंच्या निवडीसाठी लाच मागितल्याच्या आरोपप्रकरणी आज राजीनामा द्यावा लागला. त्याधी, बीसीसीआयने प्रकरणाच्या चौकशीपर्यंत या सदस्यावर निलंबनाची कारवाई केली होती.
उत्तर प्रदेशातील एका हिंदी वृत्त वाहिनीने शुक्ला यांचे कार्यकारी सहायक अकरम सैफी व क्रिकेटपटू राहुल शर्मा यांची कथित बातचित प्रसारित केली होती. त्यात सैफी राज्य संघात राहुलची निवड निश्चित करण्यासाठी ‘रोख आणि दुसऱ्या बाबींची’ मागणी करीत होते. शुक्ला सध्या उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेचे (युपीसीए) संचालक आहे. या प्रकरणात त्यांची अद्याप प्रतिक्रिया मिळालेली नाही.
बोर्डाच्या अधिकाºयाने सांगितले की,‘सैफी यांनी आपला राजीनामा दिला आहे. याबाबत शुक्ला यांना विचारले असता ते म्हणाले की, हा राजीनामा ताबडतोब स्वीकारायला हवा.’ बीसीसीआयच्या एका संदेशामध्ये म्हटले आहे की,‘प्रशासकांच्या समितीचे (सीओए) अध्यक्ष आणि कार्यवाहक अध्यक्ष (सी. के. खन्ना) यांच्यादरम्यान दूरध्वनीवर झालेल्या चर्चेनंतर बीसीसीआयने नियम ३२ नुसार आयुक्ताची नियुक्ती होईपर्यंत आम्ही सैफीकडे त्यांच्यावर असलेल्या आरोपांचे स्पष्टीकरण मागू शकतो.’ या संभाषणाची एक प्रत वृत्तसंस्थेकडे आहे. त्यात म्हटले आहे की, ‘सैफी यांच्या वक्तव्याची चौकशी आयुक्त करतील. आयुक्तांची अद्याप नियुक्ती झालेली नाही.’
बीसीसीआयच्या नियम ३२ नुसार, कुठल्या गैरवर्तनाच्या तक्रारीचा निर्णय आयुक्ताला करावा लागतो. आयुक्ताची नियुक्ती बोर्डाचे अध्यक्ष सी.के. खन्ना पुढील ४८ तासांमध्ये करतील. आयुक्ताला आपला चौकशी अहवाल १५ दिवसांमध्ये तयार करुन बीसीसीआयच्या अनुशासन समितीकडे सोपवावा लागतो. अधिकारी म्हणाला, ‘युपीसीएसोबत जुळलेल्या या प्रकरणात ते आपल्या नियमानुसार याबाबत निर्णय घेतील.’
बीसीसीआयचे एसीयू प्रमुख अजित सिंग म्हणाले, ‘आम्ही स्टिंग आॅपरेशनसोबत जुळलेल्या सर्व प्रकरणाची चौकशी करू. आम्ही चॅनलकडे आॅडिओची मागणी करुन यासोबत जुळलेल्या खेळाडूसोबतही चर्चा करू.’ या आरोपांवर शुक्ला यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही, तर बीसीसीआयने सैफीसोबत कुठल्याही प्रकारे जुळल्याचे वृत्त फेटाळले आहे. सैफी यांचा पगार बोर्डाकडून होत असल्याचे मात्र बीसीसीआयने स्पष्ट केले.
बोर्डाचा एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला, ‘बीसीसीआय केवळ आपल्या अधिकाºयांच्या खासगी सहायकांना पगार देते. अधिकारी आपल्या पसंतीचे कार्यकारी सहकारी ठेवण्यास स्वतंत्र आहेत.’ (वृत्तसंस्था)
>राहुल शर्माने अद्याप भारत किंवा राज्य संघाचे प्रतिनिधित्व केलेले नाही. त्याने आरोप केला आहे की, राज्य संघात निवड होण्यासाठी सैफीने त्याच्याकडे लाच मागितली. त्याने सैफीवर जन्माचा खोटा दाखला दिला असल्याचाही आरोप केला आहे. सैफीने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
युपीसीएचे संयुक्त सचिव युद्धवीर सिंग यांनी निवड प्रक्रियेत भष्टाचाराचे आरोप फेटाळून लावताना सांगितले की, ते कुठल्याही चौकशीसाठी तयार आहेत. युपीसीएमध्ये निवड प्रक्रियेत पारदर्शिता असते. मी कुणाच्या खासगी बातचितवर प्रतिक्रिया देऊ शकत नाही. कारण हे दोन व्यक्तींमधील प्रकरण आहे. मी राहुल शर्माची चौकशी केली आणि तो केव्हाच राज्य संघात स्थान मिळवण्याचा दावेदार नव्हता. त्यामुळे तो विश्वासपात्र नाही.’
Web Title: Shukla's staff gave up resignation, suspended by BCCI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.