मेलबर्न : ‘भारतीय संघ या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार आहे आणि २०१८-१९ च्या मालिकेत त्यांच्याकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी पूर्ण ताकदीने खेळू. भारताविरुद्धची मालिका अॅशेस मालिकेप्रमाणेच अटीतटीची आहे,’ असे मत ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकीपटू नॅथन लियॉन याने व्यक्त केले. भारताने २०१८-१९ साली ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवताना यजमानांना २-१ असे नमविले होते. विशेष म्हणजे गेल्या ७१ वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारताने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या (सीए) फेसबुक पेजवर एका व्हिडिओद्वारे लियॉनने म्हटले, ‘नक्कीच जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलियाकडून खेळत असता तेव्हा तुम्हाला सामना किंवा मालिका गमावणे आवडणार नाही. यात कोणतीही शंका नाही की, काही वर्षांपूर्वी भारताने आम्हाला नमवले होते.’ (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भारत-ऑस्ट्रेलिया मालिका अॅशेसप्रमाणेच
भारत-ऑस्ट्रेलिया मालिका अॅशेसप्रमाणेच
विशेष म्हणजे गेल्या ७१ वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारताने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 11:29 PM