Join us  

खेळपट्टीची गुणवत्ता वाढवण्याच्या उद्देशाने SIS पिचेस 'मैदानात'

क्रिकेटच्या सामन्यात खेळपट्टीला खूप महत्त्व असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 2:31 PM

Open in App

क्रिकेटच्या सामन्यात खेळपट्टीला खूप महत्त्व असते. इंग्लिश खेळपट्टीवर संघर्ष करताना दिसलेले फलंदाज भारतात धावांचा पाऊस पाडू शकतात... हाच खेळपट्टीचा फरक आहे. अलीकडेच पार पडलेल्या ट्वेंटी-२० विश्वचषकात बहुतांश सामन्यांमध्ये खेळपट्टीने गोलंदाजांना साथ दिली. याचीच सविस्तर माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने जागतिक स्तरावर आघाडीवर असलेल्या SIS पिचेसतर्फे 'गाइड टू क्रिकेट पिच सिस्टम्स' सादर करण्यात आली आहे. यामाध्यमातून खेळपट्टीचे महत्त्व, खेळपट्टीत होणारा बदल आणि बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करण्यात आला आहे. 

खेळपट्टीची गुणवत्ता वाढवण्याच्या उद्देशाने SIS पिचेसतर्फे काही बाबींचा अभ्यास करण्यात आला. हायब्रिड खेळपट्ट्या या सर्वोत्तम नैसर्गिक गवत आणि सिंथेटीक मजबुतीकरण यांचे मिश्रण असून अतुलनीय टिकाऊपणा आणि उत्तम कामगिरी बजावतात. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या धरमशाला येथील नयनरम्य स्टेडियमवर भारतातील पहिल्या SISGrass हायब्रिड खेळपट्टीचे या वर्षी मे महिन्यात अनावरण करण्यात आले. SIS पिचेसतर्फे स्वतंत्रपणे संशोधन केलेले आणि मान्यताप्राप्त हायब्रिड ग्रास तंत्रज्ञान SIS ग्रास, २०१७ पासून जागतिक स्तरावर क्रिकेट खेळपट्टी तंत्रज्ञानामध्ये नवीन मापदंड प्रस्थापित करत आहे.  

इंग्लंडचा माजी खेळाडू पॉल टेलर म्हणाला की, ही मार्गदर्शिका क्रिकेट खेळपट्ट्यांच्या व्यवस्थापन आणि देखभालीमध्ये गुंतलेल्या प्रत्येकासाठी शिकण्याचा एक मोठा स्त्रोत आहे. आजच्या वेगवान क्रिकेटमध्ये, विविध पिच यंत्रणांचे बारकावे समजून घेणे महत्वाचे आहे.  

खेळपट्टीचे प्रकार खालीलप्रमाणे - नॅचरल ग्रास पिच (नैसर्गिक गवताची खेळपट्टी)ड्रॉप-इन पिचेस १००% कृत्रिम कार्पेट (पिचचा प्रारंभिक खर्च कमी असतो)कार्पेट हायब्रीड पिचेस कृत्रिम हायब्रिड खेळपट्ट्यांना कमीत कमी देखभालीची आवश्यकता असते. स्टिच केलेल्या हायब्रीड खेळपट्ट्यांचे आयुष्य मोठे असते.