India Tour of Ireland: राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक सितांषू कोटक, साईराज बहुतुले आणि मनीष बाली यांच्याकडे टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. या महिन्याअखेरीस होणाऱ्या आयर्लंडविरुद्धच्या दोन ट्वेंटी-20 मालिकेत NCAचे प्रमुख व भारताचा माजी कसोटीपटू व्ही व्ही एस लक्ष्मण ( VVS Laxman) याच्या खांद्यावर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली गेली आहे.
भारत अ संघाचा सदस्य असलेले कोटक हे टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक असतील, तर यावर्षी झालेल्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफचे सदस्य असलेल्या बाली व बहुतुले यांच्याकडे अनुक्रमे क्षेत्ररक्षण व गोलंदाजी विभागाची जबाबदारी असेल. 26 आणि 28 जूनला आयर्लंड येथे हे सामने होणार आहेत आणि त्यासाठी लक्ष्मण टीम इंडियाचा प्रशिक्षक असणार आहे.
राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफमधील अन्य सीनियर सदस्य हे या आठवड्यात इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. त्यामुळे बाली, साईराज व कोटक हे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या व पाचव्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफची सूत्रे स्वीकारतील. ''सपोर्ट स्टाफ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाल्यानंतर बाली, बहुतुले आणि कोटक हे राजकोट व बंगळुरू येथे होणाऱ्या आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यात सूत्रे हाती घेतील. ते आधीच टीम इंडियाच्या ताफ्यात दाखल झाले आहेत,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी PTI ला सांगितले. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी बीसीसीआयने अद्याप संघ जाहीर केलेला नाही.
भारत-आयर्लंड ट्वेंटी-२० मालिका
- २६ जून - पहिली ट्वेंटी-२०
- २८ जून - दुसरी ट्वेंटी-२०
भारत-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक
- पाचवी कसोटी - १ ते ५ जुलै २०२२, एडबस्टन
ट्वेंटी-२० मालिका
- पहिला सामना - ७ जुलै २०२२, एजीस बॉल
- दुसरा सामना - ९ जुलै २०२२, एडबस्टन
- तिसरा सामना - १० जुलै २०२२, ट्रेंट ब्रिज
वन डे मालिका
- पहिला सामना - १२ जुलै २०२२, ओव्हल
- दुसरा सामना - १४ जुलै २०२२, लॉर्ड्स
- तिसरा सामना - १७ जुलै २०२२- ओल्ड ट्रॅफर्ड
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल ( उप कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, के एस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा