भारताचे आयसीसी पुरुष टी २० विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवण्याच्या आशा दोन दिवसांच्या खराब खेळाने संपुष्टात आल्या. ज्या गटात भारतीय संघ होता, त्यात खेळण्याच्या दृष्टीने सहजता होती आणि यात तीन संघ असे होते ज्यांना हरवणे सोपे होते. त्यातील दोन संघ असोसिएट देशांचे होते. त्यांना या स्तरावर खेळण्याचा अनुभवच नव्हता. दुसरा संघ अफगाणिस्तानला देखील हे कळले होते की, या वरिष्ठ संघांना पराभूत करणे सोपे नव्हते. दुसरीकड़े ग्रुप दोनमध्ये सर्व प्रमुख देश खेळत होते. हा ग्रुप सर्वांत कठीण होता. त्यांचे सामने देखील तसेच राहिले आणि अशात गतविजेता वेस्ट इंडीजदेखील पात्र ठरू शकला नाही. त्यांचे खेळाडू जगभरातील टी २० लीगमध्ये धुमाकूळ घालत असतात. बांगलादेशच्या संघ या ग्रुपमध्ये निराश राहिला. ते खूप टी २० क्रिकेट खेळतात. त्यांच्याकडे अनुभव आहे.
नामिबियाविरोधात होणाऱ्या महत्त्वहीन सामन्यात आता भारत काय करणार? या सामन्यात युवा खेळाडूंना संधी द्यायला हवी; कारण १० दिवसांनी लगेच भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी २० मालिका होणार आहे. यात नवे खेळाडू समोर येऊ शकतात. इशान किशन, राहुल चहार, वरुण चक्रवर्ती हे या मालिकेत खेळतील. नामिबियाविरोधात संधी मिळाल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढेल. गेल्या काही महिन्यांत खेळत असलेल्या वरिष्ठ खेळाडूंना आराम मिळू शकतो. कोहली टी २० चा कर्णधार म्हणून शेवटचा सामना आहे. तो विजयी निरोप घेण्यास उत्सुक असेल. एका आणखी विश्वचषक स्पर्धेत निराशा झाली आहे.
भारताकडे जगातील सर्वात मोठी आणि आकर्षक टी २० स्पर्धा असेल. मात्र जेव्हा वर्ल्ड इव्हेंटमध्ये खेळायची वेळ येते, तेव्हा भारतीय खेळाडू अपयशी ठरत आहेत. ही परिस्थिती ठीक तशीच आहे जशी इंग्लंडची फुटबॉलमध्ये आहे. इंग्लिश प्रीमियर लीग ही जगातील सर्वांत श्रीमंत आणि सर्वांत जास्त पाहिली जाणारी फुटबॉल लीग आहे. आयपीएलप्रमाणेच जगभरातील खेळाडू त्यात खेळतात. मात्र त्याचा हा अर्थ नाही ही इंग्लंड फुटबॉल वर्ल्ड कप जिंकू शकतो. कदाचित या लीग्जमुळे या संघांकडून जास्त अपेक्षा केल्या जातात आणि इतर संघ क्रिकेटमध्ये भारत आणि फुटबॉलमध्ये इंग्लंडविरोधात मजबूत इच्छाशक्तीने खेळतात. (टीसीएम)