Join us  

शिवरामकृष्णन मुख्य निवड समितीसाठी उत्सुक, राजेश चौहान, अमेय खुरासिया यांनीही भरले अर्ज

भारताचा माजी लेगस्पिनर लक्ष्मण शिवरामकृष्णन, माजी आॅफस्पिनर राजेश चौहान आणि माजी फलंदाज अमेय खुरासिया यांनी भारतीय संघाच्या मुख्य राष्ट्रीय निवडकर्ता पदासाठी अर्ज दाखल केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 4:03 AM

Open in App

नवी दिल्ली : भारताचा माजी लेगस्पिनर लक्ष्मण शिवरामकृष्णन, माजी ऑफस्पिनर राजेश चौहान आणि माजी फलंदाज अमेय खुरासिया यांनी भारतीय संघाच्या मुख्य राष्ट्रीय निवडकर्ता पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज करण्याची अखेरची तारीख २४ जानेवारी आहे.तिन्ही माजी खेळाडूंनी अर्ज दाखल केल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. बीसीसीआय एमएसके प्रसाद (दक्षिण), गगन खोडा (मध्य) यांच्याऐवजी दोन नवीन व्यक्तींना स्थान देणार आहे. सरनदीपसिंग, देवांग गांधी आणि जितीन परांजपे हे एका मोसमासाठी आपापल्या पदावर कायम असतील.देशासाठी बेन्सन अ‍ॅण्ड हेजेस स्पर्धा विजयाचा नायक आणि त्यानंतर २० वर्षांपासून समालोचन करीत असलेले शिवरामकृष्णन हे राष्ट्रीय क्रिकेट समितीचे सदस्य असून, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. माजी कनिष्ट मुख्य निवडकर्ते व्यंकटेश प्रसाद आणि माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर हेही अर्ज करण्याची शक्यता असल्याने चेअरमन पदाची दावेदारी उत्कंठापूर्ण होणार आहे.५४ वर्षीय शिवरामकृष्ण्न यांनी ९ कसोटी आणि १६ एकदिवसीय तसेच बांगर यांनी १२ कसोटी आणि १५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. व्यंकटेश प्रसाद यांनी ३३ कसोटी आणि १६१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. पण राष्टÑीय ज्युनियर निवड समितीत अडीच वर्षे घालविल्यामुळे त्यांना येथे केवळ दीड वर्षांचाच कार्यकाळ मिळू शकेल. (वृत्तसंस्था)वृत्तसंस्थेशी बोलताना शिवरामकृष्ण्न म्हणाले,‘मी खूप विचार करुन अर्ज करण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयने संधी दिल्यास नवी भूमिका उत्तमपणे बजावेन. चार वर्षे मिळाल्यास बेंच स्ट्रेंग्थ भक्कम करण्यावर भर देण्याची इच्छा आहे.’ चौहान यांनी २१ कसोटी आणि ३५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांना दुसऱ्यांदा निवड समितीत काम करायला मिळेल, अशी आशा आहे.

टॅग्स :बीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ