नवी दिल्ली - भारताचे रनमशीन विराट कोहलीला रोखणे आता गोलंदाजांसाठी अशक्यप्राय ठरू लागले आहे. दिल्लीत श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत विराटने पुन्हा एकदा डबल धमाका करत सलग दुसऱ्या कसोटीत द्विशतकी मजल मारण्याची कमाल केली. त्याबरोबरच विराटने अनेक विक्रमही मोडीत काढले आहेत.जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला भारताचा कर्णधार विराट कोहलीने नागपूरपाठोपाठ दिल्लीचा फिरोजशाह कोटलावरही द्विशतकी धमाका केला. तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कोहलीने लंकेच्या गोलंदाजांची धुलाई करताना सलग दुसऱ्या सामन्यात आपले द्विशतक पूर्ण केले. दिल्ली कसोटीत विराट कोहलीने केलेली द्विशतकी खेळी ही त्याची गेल्या दीड वर्षांतील आणि कसोटी कारकिर्दीतील सहावी द्विशतकी खेळी ठरली आहे. या द्विशतकाबरोबरच विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक सहा द्विशतके फटकावण्याच्या सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. त्याबरोबरच कसोटीत कर्णधार म्हणून सहा द्विशतके फटकावणारा विराट हा जागतिक क्रिकेटमधील पहिला फलंदाज बनला आहे. त्याबरोबरच त्याने कर्णधार म्हणून पाच द्विशतके फटकावण्याचा वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराचा विक्रम मोडीत काढला. विराटने कर्णधार म्हणून ही सहा द्विशतके केवळ 50 डावांत फटकावली हे विशेष. सलग दोन कसोटची सामन्यांमध्ये द्विशतके फटकावणार विराट हा दुसरा भारतीय ठरला आहे. विराटच्या आधी भारताच्या विनोद कांबळीने 1992-93 मध्ये सलग दोन द्विशतके फटकावली होती. ऑस्ट्रेलियाच्या सर डॉन ब्रॅडमन यांनी सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये द्विशतके फटकावण्याची कामगिरी तीन वेळा केली होती. तर इंग्लंडच्या वॉली हॅमंड यांनी असा पराक्रम दोन वेळा केला होता. आज विराटने केलेले विक्रम- कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक सहा द्विशतके फटकावणारा फलंदाज- भारतासाठी सर्वाधिक सहा द्विशतके फटकावण्याच्या सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी- सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये दोन द्विशतके - अवघ्या 17 महिन्यांच्या कालावधील सहा द्विशतके
- Cricket Buzz»
- बातम्या»
- दीड वर्षांत सहा द्विशतके! विराटकडून दिग्गजांचे विक्रम उदध्वस्त
दीड वर्षांत सहा द्विशतके! विराटकडून दिग्गजांचे विक्रम उदध्वस्त
दिल्लीत श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत विराटने पुन्हा एकदा डबल धमाका करत सलग दुसऱ्या कसोटीत द्विशतकी मजल मारण्याची कमाल केली. त्याबरोबरच विराटने अनेक विक्रमही मोडीत काढले आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2017 11:54 AM