ICCची मोठी घोषणा; सहा शहरांमध्ये रंगणार 2021च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार

यंदाचे वर्ष हे क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणीचं आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेत 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियात महिलांचा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप होणार आहे आणि ऑक्टोबरमध्ये पुरुषांची ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 09:50 AM2020-01-23T09:50:51+5:302020-01-23T09:51:47+5:30

whatsapp join usJoin us
Six cities across New Zealand will host the ICC Women’s Cricket world cup 2021 between 6 February to 7 March 2021 | ICCची मोठी घोषणा; सहा शहरांमध्ये रंगणार 2021च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार

ICCची मोठी घोषणा; सहा शहरांमध्ये रंगणार 2021च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

यंदाचे वर्ष हे क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणीचं आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेत 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियात महिलांचा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप होणार आहे आणि ऑक्टोबरमध्ये पुरुषांची ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. क्रिकेटचा हा फिव्हर 2021मध्येही कायम राहणार असल्याची काळजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) घेतली आहे. क्रिकेटप्रेमींसाठी 2021मध्येही वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे आणि त्याचे सामने सहा विविध शहरांत होणार असल्याची घोषणा गुरुवारी आयसीसीनं केली.

न्यूझीलंडमध्ये हा वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. ऑकलंड येथील इडन पार्कवर वर्ल्ड कप स्पर्धेचा सलामीचा सामना होणार आहे. त्यानंतर वेलिंग्टन, हॅमिल्टन, टौरंगा, ड्युनेडीन आणि ख्राइस्टचर्च या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होणार आहेत. 6 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत 31 सामने खेळवण्यात येतील आणि अंतिम सामना ख्राइस्टचर्च येथील हॅग्ली ओव्हल स्टेडियमवर होईल. आता हा कोणता वर्ल्ड कप, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? 2021मध्ये न्यूझीलंड येथे महिलांचा वन डे वर्ल्ड कप होणार आहे आणि त्याच्या यजमान शहरांची आज घोषणा करण्यात आली.


महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्रीया नेल्सन यांनी सांगितले की,''या वर्ल्ड कप स्पर्धेचे सर्व 31 सामने चांगल्या स्टेडियममध्ये खेळवण्यात यावीत, हा आमचा प्रयत्न आहे. चाहत्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी आम्हाला घ्यायची आहे. ''

आजच्या या घोषणेच्या वेळी भारताची माजी कर्णधार मिताली राज, न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हीनसह सुझी बेट्स व अॅमेली केर या किवी खेळाडूही होत्या. पुरुष क्रिकेटपटू टॉम लॅथम आणि हेन्री निकोल्स यांचीही यावेळी उपस्थिती होती. मितालीनं ट्वेंटी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी 2021मध्ये होणारा वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा तिचा निर्धार आहे. कदाचित तिचा हा अखेरचा वन डे वर्ल्ड कप असणार आहे. 

Read in English

Web Title: Six cities across New Zealand will host the ICC Women’s Cricket world cup 2021 between 6 February to 7 March 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.