Join us  

कोहलीनंतर धोनीच्या नावावर हा विराट विक्रम, असा करणारा सहावा भारतीय

भारतीय संघाचा माजी कर्णधार एम धोनीनं नवा विक्रम आपल्या नावं केला आहे. धोनीनं आंतरराष्ट्रीय सामन्यात 16 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. श्रीलंकेविरोधात सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 17 धावा पूर्ण करताच धोनीच्या नावार हा विक्रम झाला. 

By namdeo.kumbhar | Published: December 10, 2017 1:36 PM

Open in App

मुंबई - भारतीय संघाचा माजी कर्णधार एम धोनीनं नवा विक्रम आपल्या नावं केला आहे. धोनीनं आंतरराष्ट्रीय सामन्यात 16 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. श्रीलंकेविरोधात सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 17 धावा पूर्ण करताच धोनीच्या नावार हा विक्रम झाला. धोनीआधी नुकतेच विराट कोहलीनं दिल्ली कसोटीत श्रीलंकेविरुद्ध 16 हजार धावांचा पल्ला पार केला होता. 

धोनीने 483 व्या सामन्यात खेळताना 45.14 च्या सरासरीने 16 हजार धावा केल्या आहेत. यात त्याची १६ शतके तर 100 अर्धशतके सामील आहेत.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल क्रमांकावर आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६६४ सामन्यात ३४,३५७ धावा केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू १ सचिन तेंडुलकर: ३४,३५७ धावा २ राहुल द्रविड :२४,२०८ धावा ३ सौरव गांगुली:१८,५७५ धावा ४ वीरेंद्र सेहवाग: १७,२५३ धावा ५ विराट कोहली: १६,०२५ धावा 

पहिल्या सामन्यात भारताची अवस्था दयनिय - 

श्रीलंकेविरुद्धच्या सलामीच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकली आहे. पहिल्या सामन्यात भारताचा सलामीवीर शिखर धवनला खातेही उघडता आले नाही. डावाच्या दुसऱ्या षटकात मॅथ्यूजने श्रीलंकेला पहिले यश मिळवून दिले. कर्णधार रोहित शर्मालाही सुरंगा लकमलने बाद केले. त्यानंतर 18 चेंडूचा सामना करुन दिनेश कार्तिक शून्यावर बाद झाला. सुरंगाने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. श्रीलंकेचा कर्णधार थिसारा परेराने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय़ घेतला. गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारतीय संघाला सात गडी बाद केले आहेत. हार्दिक पांड्या दोन चौकारांसह 10 आणि श्रेयस अय्यरने 1 चौकारासह 9 धावा केल्या.  

टॅग्स :एम. एस. धोनी