Join us

Breaking : कोरोनाग्रस्त खेळाडूंची संख्या वाढली अन् पाकिस्तान सुपर लीग गुंडाळावी लागली

Pakistan Super League 2021 has been postponed पाकिस्तान सुपर लीगमध्ये कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंची संख्या वाढत चालली आहे.

By स्वदेश घाणेकर | Updated: March 4, 2021 13:24 IST

Open in App

पाकिस्तान सुपर लीगमधील ( Pakistan Super League) मधील कोरोनाग्रस्त खेळाडूंचा आकडा गुरुवारी ३ वरून ६ वर गेला. PSL-6मध्ये वारंवार बायो बबलच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचे पाहायला मिळत होते. त्यानंतरही PSL-6 सुरू ठेवण्याचा अट्टाहास आयोजकांनी घेतला. पण, खेळाडूंच्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याची संख्या दुप्पट झाल्यानंतर त्यांना उपरती आली आणि त्यांनी लीग स्थगित करण्याचा निर्णय घेतला.  ( Pakistan Super League 2021 has been postponed )  चल फूट!; सुनील गावस्कर संतापले अन् लाईव्ह सुरू असताना खडेबोल सुनावले

पाकिस्तान सुपर लीगमध्ये कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत सात जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यापैकी ६ खेळाडू आहेत. त्यानंतर फ्रँचायझी मालकांनी बैठक घेतल आणि ही लीग स्थगित करण्याचा निर्णय झाला. कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंमध्ये इंग्लंडच्या टॉम बँटनचा समावेश आहे आणि तो कदाचीत भारताविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेलाही मुकण्याची शक्यता आहे.  कराची किंग्स, पेशावर झाल्मी, मुल्तान सुल्तान्स किंवा क्युएत्ता ग्लॅडीएटर्स या संघातील खेळाडूंनी कोरोना नियम मोडल्याची चर्चा आहे. स्पर्धा नियमानुसार कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंना १० दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. कराची किंग्सचा स्टाफ सदस्य कामरान खान यांनाही कोरोना झाला आहे.   

टॅग्स :पाकिस्तानटी-20 क्रिकेटकोरोना वायरस बातम्या