नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज युवराज सिंग (Yuvraj Singh) पुन्हा एकदा त्याच्या जुन्या अंदाजात समोर आला आहे. सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या युवराजने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्याची खूप चर्चा रंगली आहे. तो फलंदाजी करत असून त्याने आपल्या चाहत्यांना आपल्या जुन्या अंदाजाची झलक दाखवली आहे. त्याचा हा अवतार पाहून शिखर धवन आणि दिग्गज ब्रायन लारा यांनाही धक्का बसला. कोणत्या प्लॅनसाठी ही तयारी सुरू असल्याची विचारणा लाराने कमेंटच्या माध्यमातून केली.
युवराज LLC मध्ये खेळणार?
व्हिडीओमध्ये युवराजने वॉरियर पुन्हा आल्याचे म्हटले आहे. तर कॅप्शनमध्ये लिहले आहे की, "जे काही होणार आहे त्यासाठी खूप उत्सुक आहे", अशा आशयाचे कॅप्शन लिहून युवराजने सर्वांचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे लवकरच लीजेंड लीग क्रिकेटमध्ये भारत विरूद्ध जग असा सामना होणार आहे. या लीगच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार असून सहा शहरांमध्ये ही लीग खेळवली जाईल. लीगमधील इंडियन महाराजा व वर्ल्ड जायंट्स या दोन संघांतील खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तब्बल १० देशातील खेळाडू या लीगमध्ये सहभागी होणार आहेत. राहिलेल्या ४ फ्रँचायझींची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. या हंगामात एकूण १५ सामने खेळवले जाणार आहे.
सौरव गांगुली यांच्या नेतृत्वात भारतीय संघ असणार आहे तर इयॉन मॉर्गनकडे रेस्ट ऑफ वर्ल्डच्या संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे या लीगमध्ये युवराज सिंग देखील सहभागी होऊ शकतो अशी चर्चा रंगली आहे. युवराज सिंग भारतीय क्रिकेटमधील एक प्रमुख चेहरा राहिला आहे. भारताकडून टी-२० आंतरराष्ट्रीय नंबर ४ वर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून त्याला ओळखले जाते.
नंबर ४ वर सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू
युवराज सिंग ३१ सामने, ७९१ धावा
विराट कोहली २० सामने, ५०९ धावा
सुरेश रैना २० सामने, ४२३ धावा
लीजेंड्स लीगसाठी संघ
इंडियन महाराजा संघ - सौरव गांगुल ( कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, युसूफ पठाण, एस बद्रीनाथ, इरफान पठाण, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, एस श्रीसंथ, हरभजन सिंग, नमन ओझा, अशोक दिंडा, प्रग्यान ओझा, अजय जडेजा, आर पी सिंग, जोगिंदर सिंग, रितिंदर सिंग सोढी.
रेस्ट ऑफ वर्ल्ड - इयॉन मॉर्गन ( कर्णधार), लेंडल सिमन्स, हर्षल गिब्स, जॅक कॅलिस, सनथ जयसूर्या, मॅट प्रायर, नॅथन मॅक्यलम, जाँटी ऱ्होड्स, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, हॅमिल्टन मसकात्झा,मश्रफे मोर्ताझा, असघर अफघान, मिचेल जॉन्सन, ब्रेट लीग, केव्हिन ओब्रायन, दिनेश रामदीन.
Web Title: Sixer King Yuvraj Singh re-entry into the cricket field, video viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.