Team India New Jersey for T20 World Cup - BCCI ने सोमवारी आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. आशिया चषक २०२२ स्पर्धेतील कामगिरीनंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात बदल पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. पण, दुखापतग्रस्त रवींद्र जडेजा व जलदगती गोलंदाज आवेश खान वगळता फार बदल दिसला नाही. जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल हे दुखापतीतून सावरून संघात परतले आहेत. या दोघांच्या अनुपस्थितीत भारताच्या गोलंदाजीतील उणीवा प्रकर्षाने जाणवल्या, परंतु आता संघ मजबूत वाटतोय.
भारताच्या वर्ल्ड कप संघात जसप्रीत, हर्षल, भुवनेश्वर कुमार व अर्शदीप सिंग हे चार जलदगती गोलंदाज आहेत. भुवीचे संघात असणे अपेक्षित होतेच, अर्शदीपने कामगिरीच्या जोरावर वर्ल्ड कप संघात स्थान पटकावले. हार्दिक पांड्या हा पाचव्या जलदगती गोंदाजाची उणीव भरून काढण्यासाठी सज्ज आहेच. मोहम्मद शमी संघात परतला आहे, परंतु त्याची राखीव खेळाडूंमध्ये निवड केली गेली आहे.
आता भारतीय चाहत्यांसाठी आणखी एक सप्राईज मिळणार आहे. मागच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ रेट्रो जर्सीत मैदानावर उतरला होता. आता पुन्हा एकदा भारतीय संघ नवीन जर्सी परिधान करणार आहे. MPL या टीम इंडियाच्या अधिकृत जर्सीसाठीच्या प्रायोजकांनी एक प्रोमो पोस्ट केला आहे. त्यात भारतीय खेळाडू पुन्हा एकदा आकाशी निळ्या जर्सीत दिसणार असल्याचे अंदाज बांधला जातोय
भारतीय संघ- रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल,अर्शदीप सिंग; राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर