सध्या श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील सलामीचा सामना खेळवला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान श्रीलंकेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला. श्रीलंकेच्या पथुम निसांकाने ऐतिहासिक खेळी करत द्विशतक झळकावले. खरं तर श्रीलंकेकडून वन डे क्रिकेटच्या इतिहासात वैयक्तिक द्विशतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. श्रीलंकेने निर्धारित ५० षटकांत ३ बाद ३८१ धावा केल्या.
पाहुण्या अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यजमान संघाकडून पथुम निसांकाने सर्वाधिक नाबाद २१० धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय अविष्का फर्नांडाने ८८ चेंडूत ८८ धावा करून मोठी धावसंख्या उभारण्यात हातभार लावला. निसांकाने १३९ चेंडूत ८ षटकार आणि २० चौकारांच्या मदतीने २१० धावांची अप्रतिम खेळी केली.
वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारे खेळाडू
- बेलिंडा क्लार्क (ऑस्ट्रेलिया) - २२९ धावा (१९९७)
- सचिन तेंडुलकर (भारत) - २०० धावा (२०१०)
- वीरेंद्र सेहवाग (भारत) - २१९ धावा (२०११)
- रोहित शर्मा (भारत) - २०९ धावा (२०१३)
- रोहित शर्मा (भारत) - २६४ धावा (२०१४)
- ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) - २१५ धावा (२०१५)
- मार्टिन गुप्टिल (न्यूझीलंड) - २३७ धावा (२०१५)
- रोहित शर्मा (भारत) - २०८ धावा (२०१७)
- ॲलेक्स कॅरी - (ऑस्ट्रेलिया) - २३२ धावा (२०१८)
- फखर झमान (पाकिस्तान) - २१० धावा (२०१८)
- इशान किशन (भारत) - २१० धावा (२०२२)
- शुबमन गिल (भारत) - २०८ धावा (२०२३)
- ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) - २११ धावा (२०२३)
- पथुम निसांका (श्रीलंका) - २१० धावा (२०२४)