Sri Lanka vs Australia 5th ODI : ०-१ अशा पिछाडीवरून सलग तीन वन डे सामने जिंकून श्रीलंकेने ३० वर्षांनंतर घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. त्यामुळे पाचव्या वन डे सामन्याला फार अर्थ उरला नव्हता. पण, पराभवामुळे चवताळलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने श्रीलंकेची दाणादाण उडवून टाकली. जोश हेझलवूड व मॅथ्यू कुह्नेमन यांनी धक्के दिल्यानंतर श्रीलंकेचे फलंदाज गोंधळले आणि त्यामुळे त्यांच्या दोन विकेट्स याच गोंधळात रन आऊट होऊन पडल्या.
कोलंबो येथेली RPS स्टेडियमवरील श्रीलंकेची सर्वात निचांक खेळी ही १९९३ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वबाद ९८ अशी होती आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९८५मध्ये ते एडलेड कसोटीत ९१ धावांवर ऑल आऊट झाले होते. आज हे विक्रम मोडले जातील अशी परिस्थिती दिसत होती. त्यांच्या ७ विकेट्स ६२ धावांवर माघारी परतले होते. कुसल मेंडिसने ( २६) खिंड लढवण्याचा प्रयत्न केला, परंतु ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर तो हिट विकेट झाला. चरिथ असलंका व जेफ्री वंदेर्साय हे रन आऊट झाले.