Sri Lanka vs Australia 4th ODI : ०-१ अशा पिछाडीवरून श्रीलंकेने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या वन डे मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. सलग दोन विजयांमुळे चौथ्या सामन्यात श्रीलंकेच्या कामगिरीवर साऱ्यांचे लक्ष लागले होते. पण, आज श्रीलंकेच्या फलंदाजांना अपयश आले, परंतु २४ वर्षीय चरिथ असलंका ( Charith Asalanka) याने ऑसींना कडवी टक्कर दिली. त्याने शतकी खेळी करून संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली, परंतु आजच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने ( Glenn Maxwell take brilient Catch) घेतलेला अफलातून झेल चर्चेचा विषय ठरला.
निरोशान डिकवेला ( १), पथूम निसंका ( १३) व कुसल मेंडिस ( १४) हे आघाडीचे तीनही फलंदाज झटपट माघारी परतल्यनंतर चरिथ असलंका व धनंजया डी सिल्वा यांनी श्रीलंकेच्या डावाला आकार दिला. ३ बाद ३४ अशा धावसंख्येवरून दोघांनी श्रीलंकेला ४ बाद १३५ धावांपर्यंत नेले. ६१ चेंडूंत ७ चौकारांसह ६० धावा करणाऱ्या धनंजयाचा अफलातून झेल
ग्लेन मॅक्सवेलने टिपला अन् सामना पुन्हा फिरला. त्यानंतर चरिथ वगळता अन्य फलंदाज ऑसी गोलंदाजांसमोर अपयशी ठरले.
चरिथने १०६ चेंडूंत १० चौकार व १ षटकारासह ११० धावा केल्या. वनिंदू हसरंगाने नाबाद २१ धावांचे योगदान दिले आणि श्रीलंकेने २५८ धावांपर्यंत मजल मारली. मॅथ्यू कुह्नेमन, पॅट कमिन्स व मिचेल मार्श यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
Web Title: SL vs AUS : Charith Asalanka scored 110 in 106 balls in the 4th ODI against Australia. Sri Lanka got bowled out for 258, What a take from Glenn Maxwell, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.