SL vs BAN Asia Cup 2023 Marathi Live Update : पाकिस्तानने आशिया चषक २०२३ स्पर्धेची शानदार सुरुवात करून दिली. आज श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात पाल्लेकेले येथे सामना सुरू आहे आणि यजमानांनी मजबूत पकड घेतली आहे. नजमुल होसैन शांतो ( Najmul Hossain Shanto) हा एकटा बांगलादेशचा किल्ला लढवतोय आणि तो शतकासमीप पोहोचला आहे. पण, याच शांतोसोबत एक गोंधळ उडालेला पाहायला मिळाला अन् मेहिदी हसन मिराज व तो क्रिजच्या एकाच एंडला जाऊन उभे राहिले. श्रीलंकेला आयती विकेट मिळाली.
पाकिस्तान अन् नेपाळ असे भारताचे दोन्ही सामने रद्द होणार; मग सुपर ४ मध्ये कसे पोहोचणार?
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला अन् श्रीलंकेने दुसऱ्याच षटकात धक्का दिला. महिशा थिक्षानाने पदार्पणवीर तांझिद हसनला भोपळ्यावर पायचीत केले. ८व्या षटकात गोलंदाजीला आलेल्या धनंजया डी सिल्वाला फटका मारण्याच्या प्रयत्नात मोहम्मद नईम ( १६) झेलबाद झाला, बांगलादेशला दुसरा धक्का बसला. मथीशा पथिराणाने बांगलादेशला तिसरा धक्का देताना शाकिब अल हसनला ( ५) बाद केले. कुसल मेंडिसने अफलातून झेल टिपला. तोवहिद हृदय आणि नजमूल शांतो यांनी बांगलादेशची पडझड थांबवत ३९ धावांची भागीदारी केली. नजमूलने अर्धशतक झळकावले, परंतु हृदय २० धावांवर पायचीत झाला.
नजमूल व मुश्फिकर रहिम चांगला खेळ करत होते, परंतु पथिराणाला पुन्हा गोलंदाजीला बोलवण्याचा श्रीलंकेला फायदा झाला. अपर कट मारण्याच्या प्रयत्नात मुश्फिकर रहिम ( १३) विकेट देऊन बसला आणि बांगलादेशचा निम्मा संघ १२७ धावांत तंबूत परतला. ३७व्या षटकात बांगलादेशच्या फलंदाजांमध्ये गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. रंजिथाच्या गोलंदाजीवर मेहिदी हसनने स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका मारला. पण, शातोने एक धाव घेण्यासाठी क्रिज सोडली अन् मिराज तेथेच उभा राहिला. रंजिथाने चेंडू हाती घेत बेल्स उडवल्या. पण, यात नेमकं आऊट कोण हा वाद सुरू झाला अन् अम्पायरने मिराजला बाद दिले. कारण, शांतोने दुसऱ्या एंडपर्यंत धाव पूर्ण केली होती, तर मिराज त्याच्या क्रिजच्या बाहेर होता.