Join us  

२ धावा, ४ विकेट्स! CSK चे गोलंदाज बांगलादेशवर पडले भारी, ज्युनियर मलिंगाने कमाल केली

SL vs BAN Asia Cup 2023 Marathi Live Update : श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात पाल्लेकेले येथे सुरू असलेल्या सामन्यात यजमानांनी अर्धी बाजी मारली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 6:39 PM

Open in App

SL vs BAN Asia Cup 2023 Marathi Live Update : श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात पाल्लेकेले येथे सुरू असलेल्या सामन्यात यजमानांनी अर्धी बाजी मारली आहे. नजमुल होसैन शांतो ( Najmul Hossain Shanto) याने एकट्याने बांगलादेशचा किल्ला लढवला. पण, महिश थिक्षना आणि मथिशा पथिराणा यांनी बांगलादेशचे कंबरडे मोडले अन् दोघांनी सहा विकेट्स घेतल्या. हे दोघंही आयपीएलमध्ये CSK कडून खेळतात. ६ बाद १६२ वरून बांगलादेश १६४ धावांवर ऑल आऊट झाले.

बांगलादेशचे फलंदाज गोंधळले! दोघंही एकाच एंडला पोहोचले, पण नेमकं OUT कोण हेच नाही समजले

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दुसऱ्याच षटकात थिक्षानाने पदार्पणवीर तांझिद हसनला भोपळ्यावर पायचीत केले. ८व्या षटकात गोलंदाजीला आलेल्या धनंजया डी सिल्वाला फटका मारण्याच्या प्रयत्नात मोहम्मद नईम ( १६) झेलबाद झाला. पथिराणाने बांगलादेशला तिसरा धक्का देताना शाकिब अल हसनला ( ५) बाद केले. तोवहिद हृदय ( २०) आणि नजमूल शांतो यांनी बांगलादेशची पडझड थांबवत ३९ धावांची भागीदारी केली. नजमूल व मुश्फिकर रहिम चांगला खेळ करत होते, परंतु पथिराणाला पुन्हा गोलंदाजीला बोलवण्याचा श्रीलंकेला फायदा झाला. रहिम ( १३) विकेट देऊन बसला.

त्यानंतर बांगलादेशचा संघ १६४ धावांत तंबूत परतला. नजमुल होसैन शांतो १२२ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ८९ धावांवर बाद झाला.  थिक्षानाने ८-१-१९-२ अशी स्पेल टाकली, तर पथिराणाने ७.४-०-३२-४ अशी सर्वोत्तम गोलंदाजी केली. श्रीलंकेकडून वन डे क्रिकेटमध्ये ४ विकेट्स घेणारा पथिराणा हा तरुण गोलंदाज ठरला. त्याने २० वर्ष व २५६ दिवसांचा असताना आज हा पराक्रम केला अन् महान गोलंदाज चमिंडा वास याचा ( २० वर्ष व २८० दिवस) १९९४ साली झिम्बाब्वेविरुद्ध नोंदवलेला विक्रम मोडला.   

टॅग्स :एशिया कप 2023श्रीलंकाबांगलादेश
Open in App