ENG vs SL Test Series : भारतीय संघाला वन डे मालिकेत दारूण पराभूत केल्यानंतर श्रीलंका आता इंग्लंडविरूद्ध खेळणार आहे. बलाढ्य भारताला नमवल्याने श्रीलंकेच्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला आहे. अशातच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने इंग्लंडविरूद्धच्या मालिकेपूर्वी एक मोठा निर्णय घेतला. इंग्लंडचा माजी खेळाडू Ian Bell श्रीलंकेच्या फलंदाजांना धडे देताना दिसणार आहे. त्याची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून वर्णी लागली. १६ ऑगस्टपासून बेल आपला कारभार सांभाळेल. श्रीलंकेचा संघ तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. इंग्लंडचा माजी खेळाडू आणि श्रीलंकेचा प्रशिक्षक बेलने ११८ कसोटी सामने खेळले असून, ७७२७ धावा केल्या आहेत. कसोटी कारकिर्दीत त्याने एकूण २२ शतके झळकावली आहेत.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सीईओ ॲश्ली डी सिल्वा यांनी सांगितले की, Ian बेलला इंग्लंड येथील खेळपट्टीची पुरेशी माहिती आहे, याची आम्हाला नक्कीच मदत होईल. तेथील परिस्थितीची जाण असलेला बेल श्रीलंकन फलंदाजांना धडे देण्यास सक्षम आहे. बेलला इंग्लंडमध्ये खेळण्याचा बराच अनुभव आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, त्याचा अनुभव आमच्या संघाला खूप मदत करेल.
ENG vs SL कसोटी मालिका२१-२५ ऑगस्ट - पहिला सामना२९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर - दुसरा सामना६ ते १० सप्टेंबर - तिसरा सामना