SL vs IND 1st ODI Match Live Macth Updates In Marathi | कोलंबो : पहिल्या वन डे सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजीत वेगवेगळे प्रयोग केले. सुरुवातीला साजेशी खेळी करण्यात यशस्वी झालेल्या श्रीलंकेला नंतर मात्र लय कायम ठेवता आली नाही. पथुम निसांकाने (५६) चांगली खेळी केली. इतर सर्व फलंदाज संघर्ष करत असताना डुनिथ वेललेजने (नाबाद ६७ धावा) अखेरच्या काही षटकांमध्ये डाव सावरून घरच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. अखेर श्रीलंकेचा संघ निर्धारित २० षटकांत ८ बाद केवळ २३० धावा करू शकला.
भारतीय गोलंदाजांनी सांघिक खेळी केली. कर्णधार रोहित शर्माने शुबमन गिलला एक षटक टाकण्याची संधी दिली, ज्यात गिलने १४ धावा दिल्या. भारताकडून अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांनी २-२ बळी घेतले, तर मोहम्मद सिराज, शिवम दुबे, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची वन डे मालिका कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवली जात आहे.
अक्षर पटेलने त्याच्या १० षटकांत अवघ्या ३३ धावा दिल्या अन् यजमान संघाच्या धावगतीला ब्रेक लावला. त्याच्या मदतीला चायनामॅन कुलदीप यादव आला. त्याने १० षटकांत केवळ ३२ धावा दिल्या. इतरही गोलंदाजांनी श्रीलंकन फलंदाजांना शांत ठेवण्यात मोलाचे योगदान दिले.
भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रिंकू सिंग, मोहम्मद सिराज.
श्रीलंकेचा संघ -
चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, जनिथ लियांगे, वानिंदू हसरंगा, अकिला धनंजया, असिथो फर्नांडो, डुनिथ वेलालेज, मोहम्मद शिराज.
Web Title: SL vs IND 1st ODI Match Live Math Updates In Marathi Sri Lanka set Team India a target of 231 runs to win
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.