SL vs IND Live : रोहितने दुबेकडे चेंडू सोपवला अन् त्यानं करून दाखवलं; पहिला बळी घेण्यात यश मिळवलं

SL vs IND 1st ODI Match Live : आज श्रीलंका आणि भारत यांच्यात पहिला वन डे सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 04:08 PM2024-08-02T16:08:58+5:302024-08-02T16:09:26+5:30

whatsapp join usJoin us
sl vs ind 1st odi match live shivam Dube gets his maiden ODI wicket, watch here video | SL vs IND Live : रोहितने दुबेकडे चेंडू सोपवला अन् त्यानं करून दाखवलं; पहिला बळी घेण्यात यश मिळवलं

SL vs IND Live : रोहितने दुबेकडे चेंडू सोपवला अन् त्यानं करून दाखवलं; पहिला बळी घेण्यात यश मिळवलं

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

SL vs IND 1st ODI Match Live Macth Updates In Marathi | कोलंबो : शिवम दुबेला सलामीच्या वन डे सामन्यात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये पहिला बळी घेण्यात त्याला यश आले. भारतीय कर्णधार रोहित शर्माने शिवम दुबेला चौदावे षटक दिले. दुबेने त्याच्या तिसऱ्या षटकातच चांगली कामगिरी केली. दुबेने टीम इंडियाला बळी मिळवून दिला. श्रीलंकेचा कुसल मेंडिस ३१ चेंडूत १४ धावा करून शिवम दुबेचा शिकार झाला. १३.१ षटकापर्यंत श्रीलंकेची धावसंख्या २ बाद ४६ अशी होती. 

नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची वन डे मालिका कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवली जात आहे. भारतीय संघात मोहम्मद सिराज तर श्रीलंकेच्या संघात मोहम्मद शिराजचा समावेश आहे. 

ट्वेंटी-२० मालिका ३-० ने खिशात घातल्यानंतर भारतीय संघ वन डे मालिकेसाठी सज्ज आहे. या मालिकेतून कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह लोकेश राहुल, श्रेयस अय्यर यांचे पुनरागमन झाले आहे. कोलंबो येथे शेवटच्या वेळी भारतीय संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेशी भिडला होता. २०२३ मध्ये झालेल्या या सामन्यात मोहम्मद सिराजचे वादळ पाहायला मिळाले होते. त्याने घातक गोलंदाजी केल्याने यजमान संघ अवघ्या ५० धावांत गारद झाला होता. मागील दहा वर्षांपासून श्रीलंकेची भारताविरूद्धची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली असून, २४ पैकी केवळ ३ सामने जिंकण्यात श्रीलंकेला यश आले आहे.  

भारतीय संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रिंकू सिंग, मोहम्मद सिराज.

श्रीलंकेचा संघ -
चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, जनिथ लियांगे, वानिंदू हसरंगा, अकिला धनंजया, असिथो फर्नांडो, डुनिथ वेलालेज, मोहम्मद शिराज.

Web Title: sl vs ind 1st odi match live shivam Dube gets his maiden ODI wicket, watch here video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.