SL vs IND : THE HITMAN SHOW! रोहित शर्माची झंझावाती खेळी; श्रीलंकेची बेक्कार धुलाई, Video

SL vs IND 1st ODI Match Live : रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 07:48 PM2024-08-02T19:48:07+5:302024-08-02T19:48:15+5:30

whatsapp join usJoin us
SL vs IND 1st odi match the hitman show Rohit Sharma's innings, watch here video | SL vs IND : THE HITMAN SHOW! रोहित शर्माची झंझावाती खेळी; श्रीलंकेची बेक्कार धुलाई, Video

SL vs IND : THE HITMAN SHOW! रोहित शर्माची झंझावाती खेळी; श्रीलंकेची बेक्कार धुलाई, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

SL vs IND 1st ODI Match Live Macth Updates In Marathi | कोलंबो : श्रीलंकेने दिलेल्या २३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने शानदार खेळी केली. रोहितने त्याचे आवडते शॉट्स खेळून श्रीलंकेच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. हिटमॅनने ३ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ४७ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. 

तत्पुर्वी, श्रीलंकेकडून पथुम निसांकाने (५६) चांगली खेळी केली. इतर सर्व फलंदाज संघर्ष करत असताना डुनिथ वेललेजने (नाबाद ६७ धावा) अखेरच्या काही षटकांमध्ये डाव सावरून घरच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. अखेर श्रीलंकेचा संघ निर्धारित २० षटकांत ८ बाद केवळ २३० धावा करू शकला. 

भारतीय गोलंदाजांनी सांघिक खेळी केली. कर्णधार रोहित शर्माने शुबमन गिलला एक षटक टाकण्याची संधी दिली, ज्यात गिलने १४ धावा दिल्या. भारताकडून अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांनी २-२ बळी घेतले, तर मोहम्मद सिराज, शिवम दुबे, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची वन डे मालिका कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवली जात आहे. 

अक्षर पटेलने त्याच्या १० षटकांत अवघ्या ३३ धावा दिल्या अन् यजमान संघाच्या धावगतीला ब्रेक लावला. त्याच्या मदतीला चायनामॅन कुलदीप यादव आला. त्याने १० षटकांत केवळ ३२ धावा दिल्या. इतरही गोलंदाजांनी श्रीलंकन फलंदाजांना शांत ठेवण्यात मोलाचे योगदान दिले.

Web Title: SL vs IND 1st odi match the hitman show Rohit Sharma's innings, watch here video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.