SL vs IND 1st T20 Match Score Live Updates In Marathi | पल्लेकले : श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल (४०) आणि शुबमन गिल (३४) यांनी चांगली सुरुवात केली. दोघांनीही स्फोटक खेळी करत भारताला मजबूत स्थितीत पोहोचवले. मात्र, संघाची धावसंख्या ७४ असताना टीम इंडियाला गिलच्या रूपात पहिला झटका बसला. त्याला दिलशान मदुशंकाने बाद केले. मग त्याच्या पुढच्या षटकात यशस्वी जैस्वाल वानिंदू हसरंगाची शिकार झाला. चांगल्या लयनुसार खेळत असलेल्या यशस्वीला बाद करण्यात वानिंदू हसरंगाला यश आले. जैस्वालने २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने २१ चेंडूत ४० धावा कुटल्या.
सलामीवीर तंबूत परतल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादववर डाव सावरण्याची जबाबदारी होती. त्याला यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने चांगली साथ दिली. सूर्या उजव्या हाताने फलंदाजी करणारा तर रिषभ डाव्या हाताने फलंदाजी करणारा खेळाडू आहे. पण, श्रीलंकेच्या कांमिदू मेंडिसने या जोडीला गोलंदाजी करताना भन्नाट शक्कल लढवली. त्याने दोन्हीही हाताने गोलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधले. मेडिंस सूर्याला डाव्या हाताने तर रिषभला उजव्या हाताने गोलंदाजी करताना दिसला.
भारताचा संघ -
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत, रियान पराग, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
श्रीलंकेचा संघ -
चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, कांमिदू मेंडिस, वानिंदू हसरंगा, दासुन शनाका, महीश थीक्ष्णा, मथीशा पथिराना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका.
दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत २९ ट्वेंटी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने १९ सामने जिंकले, तर श्रीलंकेला फक्त ९वेळा विजय मिळवता आला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात शेवटच्या वेळी जानेवारी २०२३ मध्ये ट्वेंटी-२० मालिका झाली होती. भारताने ही मालिका २-१ ने जिंकली होती. त्यानंतर भारताने मायदेशात खेळलेल्या मालिकेतही श्रीलंकेचा धुव्वा उडवला.
Web Title: SL vs IND 1st T20 Match Score Live Updates In Marathi Kamindu Mendis bowling left arm to Suryakumar Yadav and right arm to Rishabh Pant
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.