SL vs IND 1st T20 Match Score Live Updates In Marathi | पल्लेकले : आजपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. दोन्हीही संघांसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. श्रीलंका आणि भारत दोन्हीही संघ नवनिर्वाचित कर्णधार आणि प्रशिक्षकांच्या नेतृत्वात खेळत आहेत. सूर्यकुमार यादववर भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर यजमान संघाची धुरा चरिथ असलंका सांभाळत आहे. गौतम गंभीर भारतीय शिलेदारांना तर सनथ जयसूर्याला श्रीलंकेच्या खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसेल.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना पल्लेकेले येथील आंतरराष्ट्रीय मैदानात होत आहे. भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची ही पहिलीच मालिका आहे. श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंकाने नाणेफेक जिंकून पाहुण्या भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पहिल्या सामन्यात कर्णधार सूर्याने संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे आणि खलील अहमद यांना बाकावर बसवणे पसंत केले.
भारताचा संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत, रियान पराग, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत २९ ट्वेंटी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने १९ सामने जिंकले, तर श्रीलंकेला फक्त ९वेळा विजय मिळवता आला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात शेवटच्या वेळी जानेवारी २०२३ मध्ये ट्वेंटी-२० मालिका झाली होती. भारताने ही मालिका २-१ ने जिंकली होती. त्यानंतर भारताने मायदेशात खेळलेल्या मालिकेतही श्रीलंकेचा धुव्वा उडवला.