SL vs IND 1st T20 Match Score Live Updates In Marathi | पल्लेकले : श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्याच सामन्यात स्फोटक खेळी करताना यशस्वी जैस्वालने ऐतिहासिक कामगिरी करण्याच्या दिशेने कूच केली. शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या भारतीय सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. जैस्वालने स्फोटक खेळी करताच गिलने संयम दाखवला. मग संधी मिळताच त्यानेही मोठे फटके मारले. पण, यशस्वीने त्याच्या वैयक्तिक ४७ धावा केल्या असत्या तर त्याला विक्रमाला गवसणी घालता आली असती. मात्र, तो ४० धावांवर बाद झाल्यामुळे तो सात धावांमुळे अद्याप विश्वविक्रमापासून वंचित आहे.
चालू अर्थात २०२४ या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ हजार धावा करणारा यशस्वी पहिला फलंदाज ठरू शकतो. यासाठी त्याला आता केवळ सात धावांची गरज आहे. या सामन्यापूर्वी यशस्वीला १ हजार धावा पूर्ण करण्यासाठी ४७ धावांची आवश्यकता होती. (Yashasvi Jaiswal special achievement) चांगल्या लयनुसार खेळत असलेल्या यशस्वीला बाद करण्यात वानिंदू हसरंगाला यश आले. जैस्वालने २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने २१ चेंडूत ४० धावा कुटल्या.
भारताचा संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत, रियान पराग, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
श्रीलंकेचा संघ -चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, कांमिदू मेंडिस, वानिंदू हसरंगा, दासुन शनाका, महीश थीक्ष्णा, मथीशा पथिराना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका.
दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत २९ ट्वेंटी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने १९ सामने जिंकले, तर श्रीलंकेला फक्त ९वेळा विजय मिळवता आला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात शेवटच्या वेळी जानेवारी २०२३ मध्ये ट्वेंटी-२० मालिका झाली होती. भारताने ही मालिका २-१ ने जिंकली होती. त्यानंतर भारताने मायदेशात खेळलेल्या मालिकेतही श्रीलंकेचा धुव्वा उडवला.