SL vs IND 2nd t20 : भारताने टॉस जिंकला! 'या' कारणामुळे गिलला विश्रांती; संजू सॅमसनला संधी

आज श्रीलंका आणि भारत यांच्यात दुसरा ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 07:28 PM2024-07-28T19:28:06+5:302024-07-28T19:28:56+5:30

whatsapp join usJoin us
SL vs IND 2nd t20 Team India win the toss and elect to bowl first Sanju Samson replace Shubman Gill in India's XI | SL vs IND 2nd t20 : भारताने टॉस जिंकला! 'या' कारणामुळे गिलला विश्रांती; संजू सॅमसनला संधी

SL vs IND 2nd t20 : भारताने टॉस जिंकला! 'या' कारणामुळे गिलला विश्रांती; संजू सॅमसनला संधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

SL vs IND 2nd T20 Live : श्रीलंका आणि भारत यांच्यातील दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्याच्या पूर्वसंध्येला पावसाने बॅटिंग केली. त्यामुळे नाणेफेकीला विलंब झाला. अखेर ७.१५ वाजता नाणेफेक झाली अन् सूर्यकुमार यादवच्या बाजूने कौल आला. सूर्याने यजमान श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताचा उपकर्णधार शुबमन गिल मानेच्या दुखण्यामुळे दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळाली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून पाहुण्या टीम इंडियाने १-० अशी आघाडी घेतली आहे. पल्लेकले येथील आंतरराष्ट्रीय मैदानात दुसरा सामना होत आहे.

भारताचा संघ -

सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत, रियान पराग, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

आज होत असलेला दुसरा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल. एकूणच यजमान श्रीलंकेसाठी आजचा सामना म्हणजे 'करा किंवा मरा' असाच काहीसा आहे. कारण आजचा सामना श्रीलंकेने गमावल्यास त्यांचे मालिकेतील आव्हान संपुष्टात येईल. दरम्यान, भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत ३० ट्वेंटी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने २० सामने जिंकले, तर श्रीलंकेला फक्त ९वेळा विजय मिळवता आला आहे. 

Web Title: SL vs IND 2nd t20 Team India win the toss and elect to bowl first Sanju Samson replace Shubman Gill in India's XI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.