SL vs IND 3rd T20 Match Live Updates : तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील दोन सामने गमावल्यानंतर आज यजमान श्रीलंकेचा संघ अस्तित्वाची लढाई लढत आहे. भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतल्याने तिसऱ्या सामन्यात नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली. पावसामुळे नाणेफेकीला उशीर झाला. अखेर ७.४० वाजता नाणेफेक झाली. नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पल्लेकले येथील आंतरराष्ट्रीय मैदानात अखेरचा ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने आज संघात चार बदल केले असून, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर शुबमन गिलचे पुनरागमन झाले आहे. याशिवाय खलील अहमद, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबेला संधी मिळाली. तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून टीम इंडियाने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना भारतासाठी केवळ सराव असाच आहे. यजमान श्रीलंकेला मात्र अस्तित्वाची लढाई लढावी लागेल.
भारताचा संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, रियान पराग, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, खलील अहमद, मोहम्मद सिराज.