SL vs IND ODI Series : भारत आणि श्रीलंका यांच्यात २ ऑगस्टपासून वन डे मालिका खेळवली जात आहे. शुक्रवारी सलामीचा सामना खेळवला जात आहे. या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केले. या मालिकेतून विराट कोहली आणि लोकेश राहुल यांसह इतर काही खेळाडूंचे पुनरागमन होणार आहे. ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकताच रोहित आणि विराट या जोडीने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटला रामराम केले. पण, याबद्दल बोलताना हिटमॅन रोहितने एक मिश्किल टिप्पणी केली.
ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर रोहितने प्रथमच याबद्दल भाष्य केले. तो मिश्किलपणे म्हणाला की, मला असे वाटतेय की, मला फक्त एका मालिकेसाठी आराम दिला होता. आगामी काळात मोठी स्पर्धा येणार आहे म्हणूनच आम्हाला विश्रांती देण्यात आली असावी असे मला आजही वाटते.
भारताचा वन डे संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
वन डे मालिकेचे वेळापत्रक - पहिला सामना - २ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.दुसरा सामना - ४ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.तिसरा सामना - ७ ऑगस्ट - दुपारी २.३० वा
वन डे मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ -चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, कामिंदू मेंडिस, जनिथ लियांगे, निशान मदुशंका, वानिंदू हसरंगा, डुनिथ वेल्लगे, चमिका करूणारत्ने, महीश थीक्क्षा, अकिला धनंजया, असिथो फर्नांडो, मोहम्मद शिराज, इशान मलिंगा.