SL vs IND ODI : ट्वेंटी-२० त अपयश! श्रीलंकेने वन डेसाठी तगडा संघ जाहीर केला; रोहितसेनेशी भिडणार

sl vs ind odi series : भारताविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 06:55 PM2024-07-30T18:55:32+5:302024-07-30T18:55:38+5:30

whatsapp join usJoin us
sl vs ind odi series Sri Lanka announce the 16-man squad set to take on India | SL vs IND ODI : ट्वेंटी-२० त अपयश! श्रीलंकेने वन डेसाठी तगडा संघ जाहीर केला; रोहितसेनेशी भिडणार

SL vs IND ODI : ट्वेंटी-२० त अपयश! श्रीलंकेने वन डेसाठी तगडा संघ जाहीर केला; रोहितसेनेशी भिडणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

SL vs IND ODI Series : भारत आणि श्रीलंका यांच्यात २ ऑगस्टपासून वन डे मालिका खेळवली जात आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेसाठी यजमान श्रीलंकेच्या संघाची घोषणा झाली आहे. ट्वेंटी-२० मालिका ०-२ ने गमावणाऱ्या श्रीलंकेसमोर वन डे मालिका जिंकण्याचे मोठे आव्हान आहे. भारतीय संघ कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात असेल. या मालिकेतून विराट कोहली, लोकेश राहुल, मोहम्मद सिराज आणि इतर काही खेळाडूंचे पुनरागमन होणार आहे. श्रीलंकेने ट्वेंटी-२० मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने गमावल्याने भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली.

वन डे मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ -
चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदीराा समरविक्रमा, कामिंदू मेंडिस, जनिथ लियांगे, निशान मदुशंका, वानिंदू हसरंगा, डुनिथ वेल्लगे, चमिका करूणारत्ने, महीश थीक्क्षा, अकिला धनंजया, दिलशान मदुशंका, मथीक्क्षा पथिराना, असिथो फर्नांडो. 

भारताचा वन डे संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा. 

वन डे मालिकेचे वेळापत्रक - 
पहिला सामना - २ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.
दुसरा सामना - ४ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.
तिसरा सामना - ७  ऑगस्ट - दुपारी २.३० वा.

Web Title: sl vs ind odi series Sri Lanka announce the 16-man squad set to take on India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.