Join us  

शुबमन गिल तिन्ही फॉरमॅटचा खेळाडू आहे, मोहम्मद शमी बांगलादेशविरूद्ध खेळताना दिसेल - गंभीर

Gautam Gambhir press conference : प्रशिक्षक गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांनी विविध बांबीवर भाष्य केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 12:36 PM

Open in App

Key Points Of Gautam Gambhir PC : टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन क्रिकेट वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. २७ जुलैपासून भारतीय संघ श्रीलंकेच्या धरतीवर तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेनंतर तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवली जाईल. टीम इंडियाचा नवनिर्वाचित प्रशिक्षक गौतम गंभीरची प्रशिक्षक म्हणून ही पहिलीच परीक्षा आहे. या आव्हानाला सामोरे जाण्यापूर्वी गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध बांबीवर प्रकाश टाकला. यावेळी आगरकरने सूर्याला कर्णधार बनवल्याचे कारण सांगताना हार्दिकच्या फिटनेसबद्दल भाष्य केले.

अजित आगरकर म्हणाला की, सूर्यकुमार यादव कर्णधारपदासाठी योग्य उमेदवार असल्याने त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे. तो ट्वेंटी-२० मधील अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. सर्व फॉरमॅट खेळू शकेल असा कर्णधार असावा असे सर्वांनाच वाटते. हार्दिक पांड्याच्या फिटनेसच्या समस्यामुळे त्याला वगळण्यात आले. 

शुबमन गिलच्या भवितव्यावर बोलताना गंभीरने मोठे विधान केले. खरे तर मागील काही कालावधीपासून शुबमन गिल संघर्ष करत आहे. त्यामुळे त्याला संघात जागा मिळवणे कठीण झाले. पण, त्यानंतर संधी मिळताच त्याने साजेशी खेळी केली.  त्यामुळे शुबमन गिलचे भवितव्य काय हा प्रश्न उद्भवतो. यावर गंभीर म्हणाला की, गिल भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळेल, तर मोहम्मद शमी बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेतून पुनरागमन करेल. 

विराट कोहलीबद्दलच्या प्रश्नावर व्यक्त होताना गंभीरने संतप्त प्रतिक्रिया दिली. त्याचा रोख नेटकऱ्यांवर असल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहली आणि माझे खूप चांगले संबंध होते. पण, केवळ टीआरपीसाठी काहीही चालवले गेले. मी प्रशिक्षक झाल्यानंतर विराटसोबत चर्चा केली. माझे त्याच्याशी खूप चांगले संबंध होते. तो जागतिक दर्जाचा खेळाडू आहे, जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू आहे. आम्ही दोघे आमच्या संघासाठी सामने जिंकण्यासाठी कठोर परिश्रम करू, असे गौतम गंभीरने म्हटले. 

टॅग्स :गौतम गंभीरभारत विरुद्ध श्रीलंकाशुभमन गिलमोहम्मद शामीभारतीय क्रिकेट संघ