SL vs IND Series : भारतीय संघ २७ जुलैपासून श्रीलंकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवली जाईल. बीसीसीआयने दोन्हीही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा केली असून, वरिष्ठ खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. पण, झिम्बाब्वे दौऱ्यावर चमकदार कामगिरी करणाऱ्या अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांना संधी न मिळाल्याने चाहते रोष व्यक्त करत आहेत. माजी खेळाडूंनीही याबद्दल आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. टीम इंडियाचा माजी खेळाडू एस बद्रीनाथनेही बीसीसीआयवर चांगलेच तोंडसुख घेतले.
बीसीसीआयवर संतप्त प्रतिक्रिया देताना बद्रीनाथ म्हणाला की, भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी शरीरावर टॅटू आणि प्रतिमा मलिन असलेली व्यक्ती हवी. कधी कधी असे वाटते की, संघात जागा मिळवण्यासाठी वाईट असायला हवे. रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाड आणि अन्य काही खेळाडूंना का वगळले हे समजले नाही. यावरून असे दिसते की, संघात स्थान मिळवण्यासाठी काही बॉलिवूड अभिनेत्रींसोबत नातेसंबंध असणे आवश्यक आहे. याशिवाय एक चांगला मीडिया व्यवस्थापक आणि आपल्या शरीरावर टॅटू असणे आवश्यक आहे. तो त्याच्या युट्यूब चॅनलवर बोलत होता.
श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून काही वरिष्ठ खेळाडूंचे पुनरागमन झाले, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली. पण, ऋतुराज गायकवाडला एकाही संघात स्थान नसल्याने चाहत्यांनी रोष व्यक्त केला. मागील सात ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून ऋतुराजच्या नावाची नोंद आहे. ऋतुराजने त्याच्या शेवटच्या सात आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक ३५६ धावा केल्या आहेत. या यादीत यशस्वी जैस्वाल (२६३ धावा) दुसऱ्या, शुबमन गिल (२०१ धावा) तिसऱ्या, कर्णधार सूर्यकुमार यादव (१९७ धावा) चौथ्या आणि हार्दिक पांड्या १५८ धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
भारताचा ट्वेंटी-२० संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक -पहिला सामना - २७ जुलै - संध्याकाळी ७ वा.दुसरा सामना - २८ जुलै - संध्याकाळी ७ वा.तिसरा सामना - ३० जुलै - संध्याकाळी ७ वा.