SL vs IND Series Schedule : येत्या २७ तारखेपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका होणार आहे. यानंतर तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवली जाईल. सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ असेल. आगामी मालिकांसाठी बीसीसीआयने गुरुवारी आपल्या संघाची घोषणा केली. वरिष्ठ खेळाडूंच्या पुनरागमनासह काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. पण, ऋतुराज गायकवाडला एकाही संघात स्थान नसल्याने चाहत्यांनी रोष व्यक्त केला. मागील सात ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून ऋतुराजच्या नावाची नोंद आहे.
ऋतुराजने त्याच्या शेवटच्या सात आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक ३५६ धावा केल्या आहेत. या यादीत यशस्वी जैस्वाल (२६३ धावा) दुसऱ्या, शुबमन गिल (२०१ धावा) तिसऱ्या, कर्णधार सूर्यकुमार यादव (१९७ धावा) चौथ्या आणि हार्दिक पांड्या १५८ धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
झिम्बाब्वेविरूद्धच्या मालिकेत ऋतुराज गायकवाडला संधी मिळाली होती. पण तेव्हा सूर्यकुमार यादव संघाचा भाग नव्हता. पण, आता कर्णधार म्हणून सूर्याची एन्ट्री झाल्याने नवा पेच तयार झाला. म्हणूनच ऋतुराजला भारतीय संघात स्थान मिळाले नसल्याचे कळते. झिम्बाब्वेविरूद्ध यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांनी चार सामन्यात डावाची सुरुवात केली. ऋतुराज चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत होता. मात्र आता सूर्याच्या एन्ट्रीमुळे ऋतुराजला ही जागा खाली करावी लागली. पण, भारताच्या वन डे संघात मराठमोळ्या खेळाडूची वर्णी लागेल असे अपेक्षित होते. परंतु, रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघातही ऋतुराजला स्थान मिळाले नाही. त्यामुळे चाहते रोष व्यक्त करत आहेत. भारताच्या वन डे संघात ऋतूला संधी का मिळाली नाही याचे उत्तर अनुत्तरित आहे.
भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
भारताचा ट्वेंटी-२० संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक -पहिला सामना - २७ जुलै - संध्याकाळी ७ वा.दुसरा सामना - २८ जुलै - संध्याकाळी ७ वा.तिसरा सामना - ३० जुलै - संध्याकाळी ७ वा.
वन डे मालिकेचे वेळापत्रक - पहिला सामना - २ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.दुसरा सामना - ४ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.तिसरा सामना - ७ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.