SL vs IND T20I Series : २७ तारखेपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया खेळत आहे, तर नवनिर्वाचित प्रशिक्षक गौतम गंभीरची ही पहिलीच परीक्षा आहे. त्यामुळे ही मालिका नाना कारणांनी खास आहे. रोहित शर्माने ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेताच दुसऱ्या मुंबईकर खेळाडूवर ही जबाबदारी सोपवण्यात आली. सोमवारी टीम इंडिया श्रीलंकेत दाखल झाली. आज मंगळवारी सराव सत्रात गंभीरने हजेरी लावली, त्याची झलक बीसीसीआयने शेअर केली आहे.
दरम्यान, शनिवारपासून श्रीलंका आणि भारत यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर ट्वेंटी-२० आणि वन डे मालिका खेळेल. ट्वेंटी-२० विश्वचषकानंतर भारताची युवा ब्रिगेड झिम्बाब्वे दौऱ्यावर गेली होती. या मालिकेतून भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. पण, आता विराट, रोहित, हार्दिकसह सूर्यकुमार यांचे पुनरागमन झाले आहे.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओत गौतम गंभीर खेळाडूंशी संवाद साधताना दिसला. त्याच्याशिवाय कर्णधार सूर्यकुमार यादवही सहकारी खेळाडूंना मार्गदर्शन करत असल्याचे दिसते. क्रिकेटपटू, राजकारणी, मार्गदर्शक आणि आता प्रशिक्षक म्हणून गंभीर नवीन इनिंग सुरू करतो आहे.
भारताचा ट्वेंटी-२० संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक -पहिला सामना - २७ जुलै - संध्याकाळी ७ वा.दुसरा सामना - २८ जुलै - संध्याकाळी ७ वा.तिसरा सामना - ३० जुलै - संध्याकाळी ७ वा.