Babar Azam, SL vs PAK 1st Test : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने विक्रम केला, पण भारताचा Cheteshwar Pujara त्यापेक्षा 'फास्ट' निघाला

SL vs PAK 1st Test : पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आणखी एका विक्रमाला गवसणी घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 04:16 PM2022-07-19T16:16:07+5:302022-07-19T16:16:57+5:30

whatsapp join usJoin us
SL vs PAK 1st Test : skipper Babar Azam completes 3000 test runs, equal with Virat Kohli, but stay behind cheteshwar pujara  | Babar Azam, SL vs PAK 1st Test : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने विक्रम केला, पण भारताचा Cheteshwar Pujara त्यापेक्षा 'फास्ट' निघाला

Babar Azam, SL vs PAK 1st Test : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने विक्रम केला, पण भारताचा Cheteshwar Pujara त्यापेक्षा 'फास्ट' निघाला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

SL vs PAK 1st Test : पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. कसोटीच्या पहिल्या डावात बाबरने शतकी खेळी करून संघाचा डाव सावरताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10 हजार धावांचा विराट कोहलीचा विक्रम मोडला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10 हजार धावा करणाऱ्या आशियाई फलंदाजांमध्ये बाबर अव्वल स्थानावर आहे आणि जगात चौथ्या क्रमांकावर आहे. मंगळवारी त्याने आणखी एक विक्रम करातना विराटशी बरोबरी केली. पण, टीम इंडियाच्या मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) त्याच्यापेक्षा वरचढ ठरला. 

चेतेश्वर पुजाराकडे संघाचे कर्णधारपद, कौंटी क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीमुळे निर्णय 

श्रीलंकेच्या पहिल्या डावातील 222 धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानची अवस्थान दयनीय झाली होती, परंतु कर्णधार बाबर आजमने शतकी खेळी करून संघाला 218 धावांपर्यंत मजल मारून दिली. त्यानंतर श्रीलंकेला दुसऱ्या डावातही फार चांगली कामगिरी करता आली नाही. ओशादा फर्नांडो ( 64) व कुसल मेंडिस ( 76) यांनी लंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु मोहम्मद नवाज व यासिर शाह यांनी धक्के दिले. दिनेश चंडिमलने एकाकी झुंज दिली आणि त्याच्या नाबाद  94 धावांच्या जोरावर श्रीलंकेने दुसऱ्या डावात 337 धावा करून पाकिस्तानसमोर विजयासाठी 342 धावांचे लक्ष्य ठेवले.

लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर इमाम-उल-हक व अब्दुल्लाह शफिक यांनी पहिल्या विकेटसाटी 87 धावांची मजबूत भागीदारी केली. इमाम-उल-हक 73 चेंडूंत 35 धावांवर स्टम्पिंग झाला. रमेश मेंडिसने टाकलेला चेंडूचा अंदाज घेण्यास इमाम चुकला अन् यष्टिंमागून डिकवेलाने चपळाईने बेल्स उडवून त्याला स्टम्पिंग केले. तिसऱ्या अम्पायरने बराच वेळ रिप्ले पाहिल्यानंतर इमामला बाद दिले. त्यानंतर अझर अली ( 6) बाद झाला. कर्णधार बाबर व सलामीवीर शफिक यांनी पाकिस्तानचा डाव सावरला आहे. बाबर 48, तर शफिक 97 धावांवर खेळतोय आणि पाकिस्तानच्या 2 बाद 189 धावा झाल्या आहेत. 
 


बाबर आजमचा आणखी एक विक्रम केला. कसोटीत 73 डावांमध्ये 3000 धावा पूर्ण करून विराट कोहली व अँजेलो मॅथ्यूज यांच्याशी केली बरोबरी. पण, जो रूट ( 62), स्टीव्ह स्मिथ ( 63), डेव्हिड वॉर्नर ( 66), चेतेश्वर पुजारा ( 67) व केन विलियम्सन  ( 71) हे या विक्रमात आघाडीवर आहेत.  

Web Title: SL vs PAK 1st Test : skipper Babar Azam completes 3000 test runs, equal with Virat Kohli, but stay behind cheteshwar pujara 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.