Join us  

SL Vs ENG : इंग्लंडच्या कर्णधाराने मोडला विराट कोहलीचा अनोखा विक्रम

SLvENG : इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बीच कँडी येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत पाहुण्यांनी मजबूत पकड घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 5:24 PM

Open in App
ठळक मुद्देश्रीलंकेविरुद्धच्या कसोटीत इंग्लंडची मजबूत पकडजो रूटच्या शतकी खेळीने इंग्लंडचे जोरदार कमबॅकश्रीलंकेला विजयासाठी 75 धावा, तर इंग्लंडला तीन विकेट

मुंबई : इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बीच कँडी येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत पाहुण्यांनी मजबूत पकड घेतली आहे. श्रीलंकेला विजयासाठी 75 धावांची आवश्यकता आहे आणि त्यांचे तीन फलंदाज शिल्लक आहे. या सामन्यात बॅकफूटवर गेलेल्या इंग्लंड संघाला कर्णधार जो रूटने सावरले. त्याने तिसऱ्या दिवशी 124 धावांची खेळी करताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा अनोखा विक्रम मोडला.

रूटने 76 कसोटी सामन्यांत 6455 धावा केल्या आहेत, तर कोहलीच्या नावावर 73 कसोटींत 6331 धावा आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या शतकी खेळीनंतर रूटने कोहलीसह ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर ( 6363) यालाही पिछाडीवर टाकले आहे. रूटने 76 कसोटींत 15 शतकं आणि 41 अर्धशतकं झळकावली आहेत. 254 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. 

रूटने या शतकी खेळीसह इंग्लंड आणि श्रीलंकेच्या चाहत्यांना अचंबित केले. फिरकीपटूंना साथ देणाऱ्या या खेळपट्टीवर रूटने केलेली खेळी कौतुकास्पद होती. भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने रूटचे कौतुक केले, तर माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला,''प्रचंड वळसा घेणाऱ्या खेळपट्टीवर रूटने झळकावलेले शतक कौतुकास्पद आहे. अशा खेळपट्टीवर झालेले हे सर्वोत्तम शतक आहे.''इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावा केल्या त्या उत्तरात श्रीलंकेने 336 धावा केल्या. मात्र, दुसऱ्या डावात रूटने शतक झळकावताना इंग्लंडला 346 धावा करून दिल्या. 301 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचे 7 फलंदाज 226 धावांवर माघारी परतले आहेत. पाचव्या दिवशी श्रीलंकेला विजयासाठी 75 धावा करायच्या आहेत, तर इंग्लंडला तीन विकेट हव्या आहेत. 

 

टॅग्स :विराट कोहलीजो रूट