कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) १३व्या मोसमावर अनिश्चिततेचं सावट आहे. आयपीएलच्या १३ व्या मोसमावर महेंद्रसिंग धोनीचं टीम इंडियातील पुनरागमन अवलंबून होते. तसे स्पष्ट संकेत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी दिले होते. पण, आता आयपीएलच होणार नाही, तर धोनीचं पुनरागमन कसं होईल? हा प्रश्न सर्वांना पडला असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) गुरुवारी अचानक धोनीची आठवण झाली. त्यांनी सोशल मीडियावर धोनीचा एक फोटो शेअर केला आहे.
इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर माजी कर्णधार धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्या पुनरागमनाच्या शक्यता अनेकदा वर्तवण्यात आल्या, परंतु त्या चुकीच्या ठरल्या. आयपीएलनंतर तो टीम इंडियात कमबॅक करेल, अशी आशा होती. पण, कोरोना व्हायरसमुळे तीही पूर्ण होईल अशी अपेक्षा फार कमी आहे. काही दिवसांपूर्वी फिरकीपटू हरभजन सिंग यानंही धोनीनं त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला, असे विधान केले होते. त्यावरून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या आणि अजूनही त्या सुरूच आहेत.
धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.
गुरुवारी बीसीसीआयनं सोशल मीडियावर धोनीचा हसरा फोटो शेअर करताना आनंदी राहा... अशी कॅप्शन दिली. सध्या कोरोना व्हायरसमुळे चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे सर्वांना आनंदी राहण्याचा संदेश बीसीसीआयनं दिला आणि त्यासाठी त्यांनी धोनीचा फोटो वापरला.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020 रद्द झाल्यास MS Dhoniसह तीन खेळाडूंना मोठा फटका!
टीम इंडियाच्या ओपनरला ओळखलंत का? ऑस्ट्रेलियात पदार्पण करताना मोडलेला ७१वर्षांपूर्वीचा विक्रम
... तर Virat Kohli, MS Dhoni यांच्यासह अनेकांना कोट्यवधींचा भुर्दंड
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा IPL 2020 मधील सहभाग अनिश्चित, सरकारचा मोठा निर्णय
पाकिस्तान सुपर लीगमध्ये १२८ खेळाडूंची चाचणी; समोर आला अहवाल
कौतुकास्पद : जर्मन फुटबॉल संघानं Corona शी मुकाबला करण्यासाठी केली २० कोटींची मदत
Web Title: Smile is the way to be, BCCI Share MS Dhoni photo on Social Media svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.